Oven Bag : ‘या’ स्मार्ट बॅगेत शिजवा अन्न, घ्या गरमागरम जेवणाचा आस्वाद; पहा कसं शक्य आहे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Oven Bag) आपल्या देशात फुडी लोकांची काही कमी नाही. अशा लोकांना वेगवेगळे पदार्थ, मसाले, त्यांचे सुगंध आणि चवीचा अक्षरशः नाद असतो. खाण्यापिण्याबाबत प्रत्येकाची वेगळी चॉईस असते. पण थंड जेवण कुणालाच आवडत नाही. एखादा पदार्थ गरमागरम खायला मिळाला तर पोटाची आणि मनाची शांतता होते. पण, प्रत्येकवेळी तुम्ही खात असलेला पदार्थ हा गरम मिळेलच याची काही खात्री नाही. मग अनेकदा हिरमोड होतो. तुमच्याही बाबतीत असे होते का? तर आता चिंता सोडा. तुमचं फूड गरम ठेवून मूड मस्त करण्यासाठी बाजारात एक स्मार्ट बॅग आली आहे. जिच्याविषयी जाणून तुम्हाला आनंद झाला नाही तर विचारा.

फुडी लोकांच्या फायद्याची स्मार्ट बॅग (Oven Bag)

जर तुम्ही फुडी असाल आणि तुम्हाला गरमागरम खाण्याची आवड असेल तर ही स्मार्ट बॅग तुमच्या फायद्याची आहे. कारण ही बॅग एक चालता फिरता ओव्हन आणि फ्रिज दोन्ही आहे. WillTex कंपनीने WillCook नावाची एक शोल्डर बॅग समोर आणली आहे. या बॅगेची खासियत अशी की, ही बॅग फक्त तुमचं जेवण गरम ठेवत नाही, तर १८० डिग्री सेल्सियस पर्यंत अन्न शिजवण्याची देखील क्षमता ठेवते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, केवळ गरम नाही तर एखादा पदार्थ थंड ठेवण्याचे कामसुद्धा ही बॅग आरामात करते. म्हणजेच बॅग एक असली तरीही फायदे दोन आहेत.

कसं शक्य आहे?

WillCook Oven Bag ही एक हलकी पोर्टेबल आणि बॅटरी पावर्ड बॅग आहे. जी मायक्रोवेव्ह सेफ असून यातील पेटंटेड कापड हिट (उष्णता) निर्माण करते. (Oven Bag) या बॅगेत बिल्ट-इन रिचार्जेबल बॅटरी आहे. (Oven Bag) जी तुमचं जेवण फक्त २० मिनिटांत गरम करू शकते. तसेच एकदा गरम झालेलं जेवण ८२ डिग्री सेल्सियस पर्यंत गरम ठेऊ शकते. अर्थात ही बॅग तुमचे जेवण तब्बल २ तासांसाठी गरम ठेवू शकते. त्यामुळे या बॅगेचा वापर नुसता ऑफिससाठी नाही तर पिकीनिकसाठी जाताना सुद्धा करता येईल.

याशिवाय WillCook बॅग तुमचे अन्न केवळ गरम ठेवत नाही तर थंडसुद्धा ठेऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात ही बॅग तुम्हाला फायदेशीर वाटू शकते. (Oven Bag) या बॅगेत इन्सुलेटिंग कॉटन आणि अल्युमिनियम फिल्म आहेत. ज्यामुळे या बॅगेतील अन्न पदार्थ थंड राहू शकतात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही बॅग ४ डिग्री सेल्सियस इतकं कमी तापमान ठेऊ शकते. अर्थात तुमचे जेवण २ ते ३ तासांसाठी थंड राहू शकते.

भारतात लॉंच होणार?

वृत्तानुसार, अद्याप ही स्मार्ट बॅग बाजारात विक्रीसाठी आलेली नाही. मात्र, या बॅगेची विक्री यंदा सप्टेंबर २०२४ मध्ये सुरु होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या बॅगेची मूळ किंमत २०० डॉलर्स अर्थात भारतीय चलनानुसार सुमारे १६,६०० रुपये इतकी असेल. ही बॅग भारतात लॉंच होईल, याबाबत शंका घेतली जात आहे. (Oven Bag) परंतु, ही बॅग भारतात आयात करण्याचा पर्याय उपलब्ध केला जाईल अशी आशा आहे.