पुढील 5 वर्षे 81 कोटींहून अधिक नागरिकांना मिळणार मोफत अन्नधान्य; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार जनतेच्या हिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेताना दिसत आहे. आता नुकताच आणखीन एक मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशातील तब्बल 81 कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध देणारी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षांसाठी वाढवण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पुढील 5 वर्ष गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य मिळणार आहे.

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 5 वर्षांसाठी वाढवण्यास मंजूरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना महामारीच्या काळात सुरू करण्यात आली होती. आता ही योजना पुढील 5 वर्षांसाठी वाढवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2024 पासून पुढील 5 वर्षे योजना सुरू असेल.

त्याचबरोबर, या योजनेअतर्गत लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्य मिळणार आहे. तसेच 81 हजार नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. तसेच, अंत्योदय योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांना 35 किलो धान्य मिळत राहील. या योजनेसाठी सरकार 11.80 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. अशी माहिती देखील अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.