Padma Awards 2023 List : झाकिर हुसेन, मुलायमसिंग यादवांना पद्मविभूषण तर सुधा मुर्तींना पद्मभूषण अन् राकेश झुनझुनवालांना पद्मश्री जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : भारत सरकारने 2023 या वर्षासाठीच्या पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2023 List) घोषणा केली आहे. यामध्ये झाकीन हुसेन यांना कला क्षेत्रातील पद्मविभूषन पुरस्कार जाहीर झाला आहे. तर मुलायमसिंग यादव यांना पब्लिक अफेअर मधील पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

तसेच सुधा मुर्ती यांना सामजिक कार्यातील कामाबद्दल पद्मभूषण पुरस्कार जाहिर झाला आहे. तर एस एल भैरप्पा (कर्नाटक) यांना वाडमयातील पद्मभुषण जाहीर झालाय. शेअर बाजारात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या राकेश झुनझुनवाला यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानिक करण्यात येणार आहे. झुनझुनवाला यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे.

बुधवारी रात्री उशीरा केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. उद्या २६ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात सदर मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

पद्मविभुषन पुरस्कार (Padma Vibhushan 2023) –
बालकृष्ण दोशी (गुजरात)
झाकिर हुसेन (महाराष्ट्र)
एस.एम कृष्णा (कर्नाटक)
दिलिप महालनबीस (प. बंगाल)
श्रीनिवास वर्धन (अमेरिका)
मुलायमसिंग यादव (उत्तर प्रदेश)

पद्मभूषन Padma Bhushan 2023 –
एस एल भैरप्पा (कर्नाटक) – वाडमय
कुमार बिर्ला (महाराष्ट्र) – व्यापार आणि उद्योग
दिपक धर (महाराष्ट्र)
वाणी जयराम (तमिळनाडू)
स्वामी जियार (तेलंगणा)
सुमन कल्याणपूर (महाराष्ट्र)
कपिल कपूर (दिल्ली)
सुधा मूर्ती (कर्नाटक)
कनलेश पटेल (तेलंगणा)

पद्मश्री पुरस्कार
1. परशुराम कोमाजी खुणे
2. हिरा बाई लोबी
3. मुनीश्वर चंद्र डावर
4. रामकुइवांगबे न्यूमे
5. वी पी अप्पुकुट्टन पोडुवल
6. शंकुरत्री चंद्रशेखर
7. वडिवेल गोपाल और मासी सदइयां
8. तुला राम उप्रेती
9. नेकराम शर्मा
10. जनम सिंह सोय
11. धनीराम तोतो
12. बी रामकृष्ण रेड्डी
13. अजय कुमार मंडावी
14. रानी मचैया
15. के सी रनरेमसंगी
16. राइजिंगबोर कुर्कलंग
17. मंगला कांति रॉय
18. मोआ सुबोंग
19. मुनिवेंकटप्पा
20. डोमर सिंह कुंवर
21.रतन चंद्राकर
22. गुलाम मुहम्मद जाज
23. भानुभाई चित्रा
24. परेश राठवा
25. कपिल देव प्रसाद