Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी निर्दोष पर्यटकांवर थेट गोळीबार केला. या क्रूर घटनेत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये महाराष्ट्रातील सहा आणि दोन विदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. अशा संकटाच्या वेळी एअर इंडिया (Air India) पुढे सरसावत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, जो हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक ठरेल.
एअर इंडियाची मोठी घोषणा (Pahalgam Terrorist Attack)
- कोणतंही अतिरिक्त शुल्क न आकारता फ्लाइट रीशेड्यूलिंग
- विमान तिकिट रद्द केल्यास 100% रिफंड
- ही सुविधा 30 एप्रिल 2025 पर्यंत लागू
- श्रीनगर येथून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व फ्लाइट्ससाठी लागू
एअर इंडियाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन पुन्हा एकदा सुरक्षितपणे करता येणार आहे. ट्रीप पुढे ढकलण्याचा विचार करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सवलत खूप उपयोगी ठरणार आहे.
हेल्पलाइन नंबरसुद्धा जारी (Pahalgam Terrorist Attack)
तुमची फ्लाइट रीशेड्यूल करायची असल्यास किंवा तिकीटाच्या स्थितीबाबत अधिक माहिती हवी असल्यास, खालील हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा
011-69329333 / 011-69329999
या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या प्रवाशांना थोडासा दिलासा मिळणार आहे. सरकारने व इतर कंपन्यांनीही याप्रमाणे पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मंत्रालयात तातडीची बैठक
पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी Pahalgam Terrorist Attack हल्ल्यात 26 निरपराध भारतीयांचे प्राण गेले. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा तात्काळ अर्धवट सोडून दिल्लीत परत येत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संरक्षण मंत्रालयात तातडीची बैठक घेण्यात आली, ज्यात तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, अजित डोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.