Pahalgam Terrorist Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड समोर; पाकिस्तानचा आहे लाडका

_Pahalgam Terrorist Attack
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pahalgam Terrorist Attack – जम्मू अन कश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 28 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, या हल्यात अनेकजण गंभीर जखमी आहेत. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. गेल्या सहा वर्षातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून , त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाकिस्तानप्रणीत प्रॉक्सी गट (Pahalgam Terrorist Attack) –

TRF चे मुख्यालय पाकिस्तानमध्ये असून, हा गट लष्कर-ए-तोयबाचा प्रॉक्सी मानला जातो. 370 हटवल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून TRF सक्रिय झाला अन नंतर थेट दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होऊ लागला. भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, TRF ला पाकिस्तानच्या ISI अन लष्करकडून आर्थिक व तांत्रिक मदत दिली जाते.

TRF चा मास्टरमाइंड –

TRF चा सूत्रधार सज्जाद गुल सध्या पाकिस्तानातून कार्यरत आहे. त्याच्यावर भारत सरकारने मोठे इनाम जाहीर केले असून, तो हाफिज सईदचा निकटवर्तीय मानला जातो. TRF च्या सर्व प्रमुख कारवायांचे नियोजन सज्जाद गुल करतो, मात्र स्वतः कधीही थेट कारवायांमध्ये सहभागी होत नाही. TRF ची कार्यशैली ‘टार्गेट किलिंग’वर केंद्रित आहे. काश्मिरी पंडित, गैर-कश्मीरी नागरिक, अन राजकीय कार्यकर्ते हे TRF च्या हल्ल्यांचे मुख्य लक्ष्य राहिले आहेत. 2020 मध्ये कुलगाममध्ये TRF च्या नावाचा पहिल्यांदा उल्लेख झाला होता. त्यानंतर अशा हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे.

पहलगाम हल्ल्याच्या धार्मिक पार्श्वभूमीची भीती –

पहलगाम (Pahalgam Terrorist Attack) हल्ल्याच्या तपासात सुरुवातीच्या माहितीनुसार, अतिरेक्यांनी नागरिकांचा धर्म विचारून त्यानंतर गोळीबार केला. हा प्रकार 90 च्या दशकातील धार्मिक विद्वेषाच्या आठवणी जागवतो. त्यामुळे TRF फक्त दहशत निर्माण करण्याचा नाही, तर धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. भारतासाठी TRF सारख्या संघटनांचा बंदोबस्त करणे हे अत्यावश्यक ठरत आहे. सज्जाद गुलसारखे मास्टरमाइंड पाकिस्तानमध्ये सुरक्षित असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे आव्हान ठरते आहे. केंद्र सरकारकडून TRF विरुद्ध कठोर मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.