Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नवा कट; रेल्वे यंत्रणा टार्गेटवर

_Pahalgam Terrorist Attack (6)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pahalgam Terrorist Attack – पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानसह दहशतवादी संघटना अन कट्टरतावादी गट नव्या कावेबाजपणाच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. या संघटनांनी आता भारतीय रेल्वेला लक्ष्य करण्याचं नियोजन केल्याचं समोर आलं आहे. काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या अनिवासी नागरिकांवर तसेच काश्मिरी पंडितांवर हल्ले (Pahalgam Terrorist Attack) होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत.

रेल्वे यंत्रणेला खिळखिळं करण्याचा कट (Pahalgam Terrorist Attack) –

जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया वाढवण्याच्या तयारीत आहे. विशेषतः रेल्वे यंत्रणा, पोलीस कर्मचारी, CID अधिकारी तसेच इतर राज्यांतून आलेले अनिवासी रेल्वे कर्मचारी अन काश्मिरी पंडित ISI व दहशतवादी गटांच्या टार्गेटवर आहेत. उत्तर, मध्य आणि दक्षिण काश्मीरमधील रेल्वे यंत्रणेला खिळखिळं करण्याचा कट रचण्यात येत असल्याचंही स्पष्ट झालं आहे. रेल्वेच्या सेवेत असलेले अनेक अनिवासी कर्मचारी स्थानिक बाजारपेठांमध्ये फिरत असतात. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने नागरिकांना पुढील काही दिवस गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं अन सावध राहावं, असा इशारा दिला आहे.

सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत –

श्रीनगर अन गांदरबल (Pahalgam Terrorist Attack) जिल्ह्यांमध्ये काश्मिरी पंडित आणि पोलिसांवर संभाव्य हल्ल्यांची शक्यता लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ काही निर्बंध लागू करण्यात आले असून, त्यांच्या हालचालींवरही नियंत्रण ठेवण्यात येत आहे.