Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे खुलासे; तपास अहवालातून धक्कादायक माहिती उघड

_Pahalgam Terrorist Attack (8)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pahalgam Terrorist Attack – जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या प्राथमिक चौकशीच्या अहवालामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतीय लष्कर जम्मू काश्मीर पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त तपास पथकाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालात पीडित पर्यटकांच्या मृतदेहांची अवस्था आणि घटनास्थळावरचे पुरावे पाहता, अत्यंत क्रूर पद्धतीने हल्ला केल्याचे संकेत मिळाले आहेत. तर तपास अधिकाऱ्यांनी काय सांगितले आहे, या हत्यामागचे कोणते नवीन खुलासे झाले आहेत , याची माहिती जाणून घेऊयात.

तापसादरम्यान धक्कादायक माहिती समोर (Pahalgam Terrorist Attack) –

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेल्या 20 पर्यटकांची पँट खाली ओढलेली होती अन त्यांची चेन उघडलेली होती. यावरून दहशतवाद्यांनी धार्मिक ओळख पटवण्यासाठी पीडितांकडे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स मागितले. त्यानंतर ‘कलमा’ वाचायला सांगितले आणि नंतर त्यांच्या पँट उतरवून ‘खतना’ तपासला, अशी माहिती समोर आली आहे. या अमानवी कृत्यानंतर, पीडित हिंदू असल्याची खात्री होताच त्यांना गोळ्या घालण्यात आल्या.

मृतांमध्ये 25 हिंदू पुरुष –

मृतांमध्ये 25 हिंदू पुरुष असल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे. हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) मृत्यू झालेल्या पर्यटकांची ओळख पटवताना त्यांच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसल्याने सुरुवातीला कपड्यांकडे लक्ष गेले नसल्याचेही सांगण्यात आले. बचावपथकाने घटनास्थळी पोहोचल्यावर मृतदेह तसेच स्थितीत उचलले गेले होते व फक्त पांढऱ्या कापडाने झाकले गेले.

दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन –

हल्ल्यानंतर तपासाच्या सुरुवातीला 1500 जणांना ताब्यात घेण्यात आले होते, त्यापैकी 70 जणांवर संशय बळावला आहे. लवकरच मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याची आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हा हल्ला देशभरात संतापाची लाट उसळवणारा ठरला असून, केंद्र आणि राज्य सरकारने दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.