Satara News : स्वतः च्या रक्तानं चित्र काढत मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणास दिला पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणास व आरक्षणाच्या मागणीस राज्यभरातून मराठा समाजबांधवांकडून पाठींबा दिला जात आहे. दरम्यान, जरांगे पातळ यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील चित्रकार डॉ. संदीप डाकवे यांनी स्वतः च्या रक्ताने जरांगे पाटील यांचे चित्र रेखाटले आहे.

मराठा आरक्षणाचा लढा आता अधिक तीव्र होत चालला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. जसजसा वेळ पुढे सरकतोय. तसंतसं त्यांची तब्येत खालवते आहे. सातारा जिल्ह्यातूनही जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा दिला जात असून आतापर्यंत 81 गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील गावागावांत नेत्यांना बंदी व मतदानावर बहिष्कार घालण्याचे निर्णय घेतले जात आहेत. तसेच अनेक पदाधिकारी आपल्या पदांचे राजीनामे देऊन आरक्षणाची मागणी करत आहेत.

दरम्यान, मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील चित्रकार डॉ. संदीप डाकवे यांनी आपल्या रक्ताने जरांगे पाटील यांचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी देखील जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/6234497936652270

तमाम मराठा बांधवांच्या मराठा आरक्षणाबाबत अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांच्याकडून केली जाणारी मागणी हि सरकारने देखील मान्य करत ती लवकरात लवकर सोडवली पाहिजे. आम्ही देखील मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत. त्यांच्या उपोषणास आमचा पाठींबा असल्याचे चित्रकार डॉ. संदीप डाके यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.

कराडात उद्या ‘एक मराठा, लाख मराठाचा उठणार एल्गार

कराड तालुका सकल मराठा मोर्चा समाजाच्या वतीने उद्या सोमवारी दि. 30 रोजी कराड येथील तहसील कार्यालयावर लाखोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता दत्त चाैकातून मोर्चाला सुरूवात होणार आहे. या मोर्चास उद्या बहु संख्येने मराठा समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.