पाकिस्तानमध्ये खायचे वांदे!! दूध 150 रु. लिटर; गव्हाच्या पिठासाठी लोकांची हाणामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानात (Pakistan Crisis) महागाईचा वणवा पेटला आहे. महागाई एवढ्या उच्च लेव्हल ला पोचली आहे की जगण्यासाठी लोकांना दोन वेळचे जेवण करणेही कठीण झाले आहे. दैनंदिन वस्तू इतक्या महाग झाल्या आहेत की आता त्या गरिबांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. दूध, कांदे, चिकन, तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आवाक्याबाहेर असलयाने लोकांमध्ये चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. गव्हाच्या संकटामुळे तर लोक पिठाच्या पोत्यासाठी आपापसात भांडत आहेत.

पाकिस्तानमध्ये दुधाचा दर 149 रुपये प्रति लिटर, कांदे 220 रुपये किलो आणि मोहरीच्या तेलाचा दर 532 रुपये प्रति लिटर झाला आहे. गव्हाचे मोठं संकट पाकिस्तानच्या जनतेपुढे उभं आहे. 15 किलो पिठाची पिशवी 2,050 रुपये झाली आहे. काही ठिकाणी तर मागील इतके पैसे देऊनही लोकांना गव्हाचे पीठ मिळत नाही. लोक पिठाच्या पोत्यासाठी आपापसात भांडत आहेत. त्याबाबतचे विडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक भागात गव्हाचा साठा पूर्णपणे संपल्याने संकट आणखी गडद होऊ शकते.

डिसेंबर 2021 च्या तुलनेत डिसेंबर 2022 पर्यंत पाकिस्तानमध्ये चलनवाढीचा दर 12.3 टक्क्यांवरून 24.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने ही महागाई वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्या एका वर्षातच पाकिस्तानमध्ये अन्नधान्य महागाई 11.7 टक्क्यांवरून 32.7 टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे पाकिस्तान मध्ये जगणं सुद्धा मुश्किल झालं आहे.