हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या ऑपरेशन सिंदुरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तानने भारतावर २ मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला. पंजाबमधील अमृतसरमध्ये हि क्षेपणास्त्रे सोडण्यात आली, मा त्रपाकिस्तानचा क्षेपणास्त्र हल्ला भारताने उधळून लावला आहे. पाकिस्तानने आकाश क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा वापर करून हवेत डागलेले क्षेपणास्त्र भारतीय लष्कराने पाडले. अमृतसरजवळ पाकिस्तानी क्षेपणास्त्राचा ढिगारा पडलेला दिसत आहे. बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री १ वाजता अमृतसरमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले.
ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडून सुद्धा भारतावर हल्ला होण्याची शक्यता होतीच. त्यादृष्टीने भारत सावध सुद्धा आहे. भारताने अनेक विमानतळे बंद ठेवली आहे. तसेच सीमेलगतच्या भागात सुरक्षा वाढवली आहे. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान या राज्याची बॉर्डर पाकिस्तानला लागून असल्याने त्याठिकाणी धोका आहे. त्यामुळे अशा भागात भारतीय सैन्याकडून क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. याच क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा सक्रिय असल्यानेच पाकिस्तानच मिसाईल हवेतच पाडण्यात भारताला यश मिळालं आहे. या मिसाईलचे फोटो आणि विडिओ सुद्धा व्हायरल झाले आहेत, मात्र या व्हिडिओची पुष्टी झालेली नाही.
कुपवाडा, पूंछ येथे जोरदार गोळीबार-
दरम्यान, पाकिस्तानचे नापाक कारनामे जम्मू काश्मीर भागातही सुरु आहेत. पाकिस्तानकडून सातत्याने loc वर गोळीबार करण्यात येतोय. नियंत्रण रेषेवरील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, अखनूर, पूंछ येथे जोरदार गोळीबार सुरु आहे. पूंछ आणि तंगधार येथे पाकिस्तानच्या गोळीबारात १५ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पूंछमधील श्री गुरु सिंह सभा गुरुद्वारा साहिबवरही पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यामध्ये भाई अमरिक सिंग (रग्गी), भाई अमरजीत सिंग आणि भाई रणजीत सिंग या तीन शीख भाविकांचा मृत्यू झाला.




