पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; धक्कादायक Video समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात देशव्यापी कारवाईनंतर या संघटनेचे समर्थकही निषेध करत आहेत. पीएफआय वरील कारवाई नंतर पुण्यातील मुस्लीम समाजातील काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाह हू अकबर अशा घोषणा देण्यात आल्या. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

पुणे पोलिसांनी या घोषणाबाजी प्रकरणामध्ये रियाज सय्यद आणि ६० ते ७० पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भादवी 141 143 145 147 149 188 341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा झाल्याचा उल्लेख पोलिसांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, यावेळी आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणा दिल्या. सदर व्हिडिओ मधेही या घोषणा ऐकू येत आहेत. मात्र पोलिसांनी मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही घोषणा त्यावेळी दिल्या नसल्याचा दावा केला आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊन नका असं आवाहन पोलिसांनी केलं. पोलिसांकडून या संदर्भात पुढील तपास सुरू आहे.