IND vs PAK : पाकिस्तानला मोठा झटका! ‘हा’ प्रमुख खेळाडू Asia Cup स्पर्धेतून बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आशिया कप 2022 (Asia Cup) काही दिवसांवर येऊन ठेपली असताना पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तान टीमचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. तो आशिया कप (Asia Cup) स्पर्धेला मुकणार आहे. गुडघे दुखापतीमुळे शाहीन आफ्रिदीला एका महिन्यापेक्षा जास्त काळ विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली आहे. आशिया कप (Asia Cup) मध्ये भारताचा पहिला सामना 28 ऑगस्ट पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

4 ते 6 आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला
शाहीन शाह आफ्रिदीच आशिया कप मध्ये (Asia Cup) न खेळणे हा पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे तर भारतासाठी दिलासादायक बाब आहे. गॉल येथे श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात खेळताना शाहीन शाह आफ्रिदीचा उजवा गुडघा फिल्डिंग करताना दुखावला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला 4 ते 6 आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आशिया कप (Asia Cup) आणि मायदेशात होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही. पण ऑक्टोबर मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 तिरंगी मालिकेत खेळू शकतो. तसेच यानंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप मध्येदेखील तो खेळताना दिसणार आहे. ऑक्टोबर महिन्यात तो स्पर्धात्मक क्रिकेटमधून तो पुनरागमन करणार आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर