भारत-पाकिस्तानमधील तणाव सध्या कमी झाला असला तरी अलीकडील घडामोडींमध्ये पाकिस्तानचा एक खोटा दावा पूर्णपणे उघडकीस आला आहे. पाकिस्तानने अलीकडेच दावा केला होता की, त्याच्या जेएफ-17 लढाऊ विमानांनी भारताच्या अत्याधुनिक S-400 एअर डिफेन्स सिस्टमला आदमपूरमध्ये नष्ट केलं आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोशल मीडियावर S-400 च्या बरोबरीने काढलेली एक फोटो पोस्ट करताच हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
पाकिस्तानचा खोटा प्रचार उघड
पाकिस्तानने जेव्हा हा दावा केला होता, तेव्हा भारतीय लष्कराने तत्काळ त्याचे खंडन केले होते. तरीही, पाकिस्तानकडून प्रचार चालूच होता की भारताची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट करण्यात आली आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनी आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचा ट्विटर) हँडलवर शेअर केलेल्या फोटोमध्ये S-400 संपूर्णपणे सुरक्षित आणि क्रियाशील स्थितीत दिसतो आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर मिळालं आहे.
ऑपरेशन सिंदूरमधील भारताचा यशस्वी प्रत्युत्तर
भारताने अलीकडेच पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर व पाक शासनावर थेट कारवाई केली. या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी अत्यंत प्रभावी समन्वय साधत यश मिळवलं. यामागे मुख्य कारण म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) या पदाची निर्मिती, ज्यामुळे तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय अधिक बळकट झाला.
पाकिस्तानचा खोटा दावा पंतप्रधान मोदींच्या एका फोटोमुळे उघड झाला आहे. S-400 प्रणाली भारताच्या ताफ्यात पूर्णपणे सुरक्षित आणि सज्ज आहे, आणि भारत कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.