Saturday, January 28, 2023

पालघरमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक; अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. बसच्या या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केले आहे.

पोलिसांनी एसटी अपघातातील जखमींना तत्काळ जव्हार येथील पतंगशाहा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पहाटेच्या सुमारास नाशिक सिलवासा आणि जळगाव सिलवासा या दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या. जव्हार सिल्वासा मार्गावरील जयसागर डॅमजवळ झालेल्या या अपघातात दोन्ही एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही बसमधील 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर सध्या जव्हार येथील पतंगशाहा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहे.