PAN-Aadhaar Linking | तुम्ही देखील कर भरत असाल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कर भरत असेल, तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण आता आयकर विभागाने 31 मे पूर्वी पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याचे आव्हान केलेले आहे. तुम्ही जर असे केले नाही तर त्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. आयकर विभागाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर ट्विट करून सगळ्यांना ही माहिती दिलेली आहे.
आयकर विभागाने (PAN-Aadhaar Linking) दिलेल्या नियमानुसार आता ज्या लोकांनी पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केले नाही तर त्याला दुप्पट टीडीएस भरावा लागणार आहे. 24 एप्रिल 2024 रोजी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांनी म्हटलेले आहे की, ज्या खात्यांमध्ये 31 मार्च 2024 पर्यंत व्यवहार झाले असतील, त्या खात्यांमध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले नसल्यावर जास्त टीडीएस कापला जाणार आहे.
आयकर विभागाने करतात त्यांना 31 मे म्हणजे शुक्रवार पर्यंत आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख दिलेली आहे. जेणेकरून त्यांचा कर कपात होऊ नये. आयकर नियमानुसार पॅन कार्ड बायोमेट्रिक आधार कार्डशी लिंक नसेल तर त्यांना मोठा आर्थिक धक्का सहन करावा लागू शकतो.
आयकर भरण्याची शेवटची तारीख | PAN-Aadhaar Linking
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै असून याआधी सीबीडीटीने प्रत्येकाला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची आव्हान दिलेले आहे. त्याचप्रमाणे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही, तर त्यामुळे काय तोटे होऊ शकतात. हे देखील सांगितलेले आहे. त्यामुळे आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्यासाठी दोनच दिवस राहिलेले आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे काम पूर्ण करा.