Pan Card Rules | पॅनकार्ड बाबत ‘ही’ चूक पडू शकते महागात; भरावा लागणार 10 हजारांचा दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pan Card Rules | भारतीय नागरिकांसाठी पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र आहे. या पॅन कार्डवर तुमचा दहा अंकी एक नंबर असतो. त्याला युनिक आयडेंटिफिकेशन अल्फा न्यूमरिक नंबर असे म्हणतात. त्याला पॅन क्रमांक असे म्हणतात. यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख,वडिलांचे नाव, जोडीदाराचे नाव, फोटो, क्रमांक असतो बँकिंग कामांमध्ये पॅन कार्डचा (Pan Card Rules) खूप वापर केला जातो.

अनेक कामांमध्ये आपल्या ओळखीचा पुरावा किंवा जन्मतारखेचा पुरावा म्हणून पॅन कार्ड सादर केले जाते. परंतु अनेक वेळा लोक हे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बनवतात. जे कायदेशीर रित्या योग्य आहे की नाही? हे आणि त्यांना माहीत नसते आणि त्यामुळे त्यांच्यावर दंड पद्धतीने कारवाई केली जाते.

आयकर नियम | Pan Card Rules

आयकर नियमानुसार कलम 139 A 7 नुसार कोणतीही व्यक्ती एका पेक्षा जास्त पॅन कार्डसाठी अर्ज करू शकत नाही. किंवा एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरू देखील शकत नाही. परंतु जर चुकून एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड आढळले. तर ते कायदेशीररित्या गुन्हा आहे. अशावेळी त्या नागरिकांना दंड देखील होऊ शकतो.

किती दंडवत होतो?

तुम्ही जर एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला दंड होऊ शकतो. आयकर कायद्याच्या कलम 172 B यांच्या अंतर्गत जर एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असेल तर तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो जो मूल्यांकन अधिकाऱ्याद्वारे निर्धारित केला जातो.

पॅन कार्डचे महत्व | Pan Card Rules

पॅन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. करदात्यांसाठी महत्त्वाचे कागदपत्रे आहे. पॅन कार्डवर तुमचे सगळे आर्थिक व्यवहार असतात. ज्याद्वारे सरकार तुमच्या पैशांच्या देवाण-घेवाण निश्चित तपासणी करत असते. यावेळी आयकर भरताना पॅन कार्ड महत्त्वाचे असते. पण आयकर विभागाने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याचे सक्तीचे केलेले आहे. त्यामुळे बँकिंग व्यवहारांमध्ये जास्त पारदर्शकता येते.