Pan Card | सावधान ! ‘ही’ चूक केली तर पॅन कार्ड धारकांना भरावा लागणार 10 हजार रुपयांचा दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pan Card | आपल्या भारतात आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन अत्यंत महत्त्वाची अशी कागदपत्र आहेत. या दोन कागदपत्रांशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारचे सरकारी काम करता येत नाही. अगदी साधे सिम कार्ड काढायचे असेल तरी देखील आपल्याला आधार कार्ड लागते. एवढेच काय तर अगदी बसमध्ये आपल्याला दैनिक पास देखील काढायचा असेल, तरी आपल्याला आधार कार्ड द्यावे लागते. त्यामुळे आता यावरून आपल्याला आधार कार्ड किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते.

आज-काल आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड देखील खूप महत्त्वाचे आहे. पॅन कार्ड आता हे शासकीय कागदपत्रांमध्ये एक प्रमुख असे कागदपत्र आहे. ज्याचा वापर वित्तीय कामांसाठी केला जातो. कोणतेही वित्तीय काम करायचे असेल, तर पॅन कार्ड शिवायचे काम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे आजकाल प्रत्येक व्यक्तीला पॅन कार्ड काढावेच लागते.

अगदी तुम्हाला बँकेत नवीन अकाउंट ओपन करायचे असेल तरी तुम्हाला आधी पॅन कार्ड द्यावे लागते. तरच तुमच्या बँकेच्या अकाउंट ओपन होते. म्हणजेच पैशाच्या बाबत कोणतीही कामे असली, तरी ती पॅन कार्ड शिवाय आता पूर्ण होत नाही. परंतु पॅन कार्डचा वापर करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

पॅन कार्ड वापरताना जर कोणताही गोंधळ झाला, तर यासाठी पॅन कार्ड धारकांना खूप मोठा दंड भरावा लागू शकतो. तर आज आपण पॅन कार्ड वापरताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला आहे. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पॅन कार्ड वापरताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी | Pan Card

पॅन कार्ड हे वित्तीय कामांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे याचा वापर करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. एखाद्याने जर पॅन कार्ड क्रमांकाचा योग्य वापर केला नाही, तर त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आणि याचा त्याला आर्थिक भुर्दंड देखील मोठ्या प्रमाणात भरावा लागतो.

त्याचप्रमाणे जर त्या व्यक्तीने चुकीचा पॅन क्रमांक टाकला. तर त्याला दहा हजार रुपयांचा दंड देखील भरावा लागतो. याचाच अर्थ पॅन क्रमांक संबंधी आयकर विभागात अनेक कडक नियम लावलेले आहे. त्यामुळे आयकर विवरणपत्र भरताना अचूक पण क्रमांक भरणे खूप गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे जर तुमचे पॅन कार्ड चोरीला गेले तर तुम्ही जास्त वेळ न थांबता तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणे खूप गरजेचे आहे. कारण हे पॅन कार्ड तुमच्या वित्तीय कामासाठी वापरले जाते. जर हे पॅन कार्ड जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडले, तर तो व्यक्ती या पॅन कार्डचा चुकीचा वापर करून तुम्हाला अनेक घोटाळ्यांमध्ये फसवू शकतो.

त्याचप्रमाणे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरणे हा देखील कायद्याने खूप मोठा गुन्हा आहे. जर तुमच्याकडे दोन कार्ड असतील तर एक कार्ड तुम्ही लगेच आयकर विभागात सरेंडर केले पाहिजे. नाहीतर आयकर विभाग अशा व्यक्तींवर खूप मोठी कारवाई करू शकते. त्यामुळे पॅन कार्ड वापरताना आता इथून पुढे खूप खबरदारी घ्यावी लागणार आहे. नाहीतर जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने याचा वापर केला तर याचा तुम्हाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.