व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पाचगणी नगरपालिकेला केंद्र शासनाचा नॅशनल टुरीझम ॲवार्ड जाहीर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
स्वच्छतेच शहर म्हणुन नावलौकीक असलेल्या पाचगणी शहराला केद्रीय पर्यटन मंत्रालयाचा नॅशनल टुरीझम ॲवार्ड घोषित झाला आहे. पाचगणी शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सर्वोच्च पर्यटन सुविधा देणारे शहर म्हणून पाचगणी शहराची नियुक्ती झाली, असल्याची माहीती मुख्याधिकारी तथा प्रशासक गिरीश दापकेकर यांनी दिली.

जगविख्यात दोन नबंरच पठार तसेच स्वच्छतेच शहर म्हणून नावलैाकीक असलेल शहर म्हणून ओळख पाचगणी शहराची आहे. देश व विदेशातून येणा-या पर्यटकंना मूलभुत सुविधा देताना उत्कृष्ट नियोजन असल्याने केद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडून याबाबत प्रस्तावाची मागणी करण्यात आली होती. पर्यटकांना मूलभुत सुविधा देणारा सर्व बाबीच परीपूर्ण अहवाल पाचगणी नगरपालीकेकडून सन 2018-19 केद्रीय पर्यटन मंत्रालयाला सादर करण्यात आला होता. यावरुन केद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या टीमने पाचगणी शहरात येवुन सर्वे देखील केला. पाचगणी शहराला देण्यात येणारा नॅशनल टुरीझम ॲवार्ड दिल्ली येथे 27 सप्टेंबरला देण्यात येणार असल्याची मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पत्रकार परीषदेत दिली.

पाचगणी शहराला मिळालेला पुरस्कार हा सर्वार्थी नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सिहांचा वाटा असून हा पुरस्कार पाचगणी शहराच्या सर्वसामान्य जनतेच यश असल्याचे प्रतिक्रीया मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली. पाचगणी शहराला नॅशनल टुरीझम ॲवार्ड मिळाल्याने मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या कार्यशैलीचे स्वागत केले जात आहे.