Pandemic | जगावर पुन्हा एकदा येणार सगळ्यात मोठे महामारीचे संकट, तज्ज्ञांनी दिला मोठा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pandemic| तीन वर्षांपूर्वी संपूर्ण जगावर कोरोनाचे एक मोठे संकट आले होते आणि या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झालेले होते. या काळात कोरोनाला हरवण्यासाठी सगळ्यांना घरात बसून स्वतःची काळजी घ्यावी लागली होती. आता हे घडून बरेच दिवस झालेले आहेत. तरीदेखील याचा धोका अजून टळलेला नाही. आणि याबाबतच माहिती आरोग्य तज्ञांनी दिलेली आहे.

जागतिक महामारी आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. परंतु आता त्या संसर्गाची तीव्रता अतिशय कमी झालेली आहे. तरी देखील हा धोका अजूनही टळलेला नाही. असे देखील त्यांनी सांगितलेले आहे. येणाऱ्या काही काळात देशावर एक मोठं महामारीच संकट ओढवू शकणार असल्याचा इशारा तज्ञांनी दिलेला आहे.

युकेमधील साथीचे रोग तज्ञांनी जगावर येणाऱ्या या संकटाबद्दलची चिंता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे त्या काळात प्राण्यांद्वारे माणसाला होणारा विषाणू संसर्गाद्वारे धोका वाढवून त्याचे रूपांतर महामारीमध्ये (Pandemic) देखील होऊ शकते. अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे.

तज्ञ काय म्हणाले ? | Pandemic

त्यावेळी या महामारीची माहिती देताना तज्ञ म्हणाले की, आणखी एक महामारी जगापुढे उभी आहे. ही दोन वर्ष, वीस वर्षे किंवा कधीही कितीही काळासाठी ती टिकू शकते. पण अशा परिस्थितीत आपण हतबल होऊन चालणार नाही. आपल्याला महामारीशी दोन हात करण्यासाठी सज्ज होणे गरजेचे आहे. इंग्लंडमधील किंग्स महाविद्यालयामध्ये या विषयावर व्याख्याते असणाऱ्या मॅकेट बोर्ड यांनी पुन्हा त्यागासाठी तयार करा असाही त्यांनी इशारा दिलेला आहे.”

सध्या जगात तापमान वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचप्रमाणे जंगलतोड या दोन गोष्टींमुळे प्राण्यामुळे माणसांमध्ये अनेक विषाणूंचा संसर्ग पसरण्याचा धोका वाढत असल्याची भीती देखील तज्ञांनी व्यक्त केलेली आहे. त्यांच्या मते ॲमेझॉन आणि आफ्रिकेतील मोठ्या भागात जंगलतोड झाल्यामुळे प्राणी आणि कीटकांच्या अनेक प्रजाती या मानवी वस्तीच्या दिशेने येऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे आता मानवनिर्मित वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल होऊन मोठा आजार पसरण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे.

या जागतिक तापमान वाढीमुळे चिकनगुनिया, डेंगू, प्रीमियम, कोंगो, फीवर यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्याचप्रमाणे युरोपच्या काही भागांमध्ये या आजारांचा प्रादुर्भाव देखील पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे आता तरी कोरोनाचे संकट टाळले असले, तरी आणखी एका महामारीला संपूर्ण जगाला तोंड द्यावे लागू शकते अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेली आहे.