राज्यात १ सप्टेंबरपासून ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम

health program
health program
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | ‘सही पोषण, देश रोशन’ या घोषवाक्याने कुपोषणमुक्ती व पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१८ ला राज्यात ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास आणि महिला -बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप देवून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन
मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.