Papaya Peel On Face | पपईची साल फेकून न देता चेहऱ्याला लावा, होतील आश्चर्यकारक फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Papaya Peel On Face | पपई हे एक लाभदायक फळ आहे. आपल्या शरीराला पोषणतत्व मिळण्यासोबत आपल्या त्वचेला देखील पपई खाल्ल्याने खूप फायदे होतात. पपईची केवळ साल जरी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावली तरी, तुम्हाला त्याचे खूप फायदे मिळतील. तुम्हाला जर नेहमी पिंपल्स येत असतील किंवा त्याचे डाग धब्बे राहिले असतील. त्याचप्रमाणे तुमची स्किन खूप डीहायड्रेट झाली असेल, तर तुम्ही पपईच्या सालीचा वापर करून नक्कीच चांगला इफेक्ट मिळू शकता. आता आपण पपईच्या सालीपासून (Papaya Peel On Face) तुमच्या चेहऱ्याला नक्की काय काय फायदे मिळतात हे पाहणार आहोत.

पपईच्या सालीमध्ये आढळणारे पोषक घटक

विटामिन ई, विटामिन सी, विटामिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, एन्झाईम लायकोपिन इत्यादी घटक पपईमध्ये असतात.

चेहऱ्यासाठी पपईच्या सालीचे महत्त्व | Papaya Peel On Face

एक्सफोलीएटिंग

पपईच्या सालीमध्ये पॅपेन नावाचे एक एंझाईम असते. जो तुमच्या त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात. आणि त्यामुळे तुमची त्वचा एकदम गुळगुळीत आणि चमकदार दिसते.

हायड्रेटिंग

पपईच्या सालीमध्ये जीवनसत्व ए आणि ई असतात जे तुमच्या त्वचाला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल, तर तुम्ही पपईच्या सालीचा वापर करून चांगला फायदा मिळवू शकता.

अँटी एजिंग

पपईच्या सालीमध्ये विटामिन सी आणि लायकोपिनियन सारखे अँटिऑक्सिडंट उपलब्ध असतात. त्यामुळे त्वचेच्या वृद्धत्वाची प्रक्रिया कमी होते.

मुरुमांवर प्रभावी

पपईच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ दाहक विरोधी गुणधर्म आढळतात जे मुरमांवर उपचार करण्यासाठी मोठी फायदेशीर असतात.

त्वचेचा टोन सुधारत

पपईच्या सालीमध्ये विटामिन सी असते जे तुमच्या त्वचेचा टोन सुधारते. जर तुम्हाला हाइपर पिगमेंटेशन असेल तर पपईच्या सालीमुळे तुम्हाला ते कमी करण्यासाठी मदत होते.

पपईची साल कशी वापरावी ? | Papaya Peel On Face

फेस मास्क: पपईची साल बारीक करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुवा.

स्क्रब: पपईची साल बारीक करून त्यात साखर किंवा मीठ मिसळा. या स्क्रबने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

टोनर: पपईची साल उकळून टोनर बनवा. हे टोनर चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या.

मॉइश्चरायझर: पपईची साल बारीक करून त्यात ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेल मिसळा. हे मॉइश्चरायझर चेहऱ्यावर लावून रात्रभर राहू द्या.