व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भूतबाधा घालवण्यासाठी 6 वर्षीय मुलीला जीव जाईपर्यंत मारहाण; आई वडिलांचे निर्दयी कृत्य

नागपूर । डोक्यात अंधश्रद्धेच भूत असेल तर माणूस काहीही करतो. असाच एक किळसवाणा प्रकार नागपूर येथे घडला आहे. एका सहा वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याच्या शंकेने तिच्या आईवडिलांनी तिला भुतबाधेतून मुक्त करण्यासाठी इतकी जबर मारहाण केली या मारहाणीत मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भात प्रतापनगर पोलिस स्ठानकात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

नागपूर येथील सुभाष नगर परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ चिमणे व त्याची पत्नी रंजना चिमणे यांना सहा वर्षीय मुलगी होती. गेले काही दिवसांपासून मुलीची अवस्था, सतत आजारी राहणे आणि तिचे हावभाव लक्षात घेऊन तिला भूतबाधा झाल्याची शंका चिमणे दांपत्यांना होती. ते तिला घेऊन एका भोंदू बाबा कडे गेले. भोंदू बाबाच्या सल्ल्याने त्यांनी तिच्यावर वेगवेगळे उपचार सुरू केले होते. मात्र त्याचा काहीच फायदा होत नव्हता.त्यानंतर शुक्रवारी आणि शनिवारच्या दरम्यानच्या रात्री चिमणे दांपत्य आणि एक महिला नातेवाईक हिच्या उपस्थितीत मुलीच्या अंगतील भूत काढण्यासाठी तिला बेल्ट आणि हाताने जबर मारहाण केली. या मारहाणी नंतर चिमुकली निपचिप शांत पडली.

यानंतर घाबरलेल्या आईवडिलांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली मात्र त्यापूर्वीच तिने प्राण सोडला होता. निर्दयी आई-वडील एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आपण पकडले जाऊ या भीतीने मुलीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात ठेवून तिथून पळ काढले. मात्र, रुग्णालयाच्या आवारात एका लहान मुलीचे मृतदेह बेवारस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच सदर ठिकाणचे सीसीटीव्ही चेक करून या प्रकरणाचा उलगडा केला . सीसीटीव्हीत आरोपींनी आणलेल्या गाडीचा क्रमांक दिसला. त्यावरून त्यांनी त्यांचा तपास करत तिघांनाही अटक केली.