Navra Maza Navsacha 2 : खुशखबर!! “नवरा माझा नवसाचा” चित्रपटाचा पार्ट 2 येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या वीस वर्षांपूर्वी म्हणजे 2004 साली प्रदर्शित झालेल्या “नवरा माझा नवसाचा” (Navra Maza Navsacha) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली होती. अभिनेता सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या जोडीला चित्रपटामुळे भरभरून प्रेम मिळाले होते. आता याच दोघांच्या चाहत्यावर्गासाठी आणि सर्व मराठी प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आता लवकरच नवरा माझा नवसाचा (Navra Maza Navsacha 2) या चित्रपटाचा पार्ट टू देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची माहिती एका मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करून दिली आहे.

चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात.. (Navra Maza Navsacha 2)

2004 साली नवरा माझा नवसाचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केले होते. आता थेट 2024 साली या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले आहे. हा भाग दोन देखील सचिन पिळगावकर दिग्दर्शित करत आहेत. याची माहिती अभिनेते जयवंत वाडकर यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाच्या क्लॅपचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिले आहे की, “नवरा माझा नवसाचा 2..” चित्रपटाचे चित्रीकरण उद्यापासून सुरू होतं आहे. तुमचे आशीर्वाद पाठिशी राहू द्या.’

जयवंत वाडकर यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. तसेच इतर कलाकारांनी चाहते वर्गांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आता सर्वांनाच नवरा माझा नवसाचा 2 चित्रपट (Navra Maza Navsacha 2) कधी प्रदर्शित होईल याची उत्सुकता लागून राहिली आहे. या भाग दोनमध्ये देखील प्रेक्षकवर्गाला तितकेच मनोरंजन, मस्ती पाहायला मिळेल अशी आशा आहे. मुख्य म्हणजे, या भाग दोन मध्ये नेमके कोणकोणते कलाकार पाहायला मिळतील याबाबत जास्त उत्सुकता लागून राहिली आहे.