कराड पालिकेच्या पाणी बिलावर पक्ष, संघटना आक्रमक, सर्व निर्णयांना स्थगिती : आता 6 फेब्रुवारीला बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
कराड शहरात पालिकेने मीटर प्रमाणे पाणी बिल आकारणी सुरू केली. यामध्ये बिलाची रक्कम मोठी आल्याने कराडच्या लोकशाही आघाडीने पाणी बिलात नागरिकांना 20 टक्के सूट द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर मुख्याधिकारी यांनी 15 टक्के सूट जाहीर केली. याबाबतची हॅलो महाराष्ट्रची बातमी समजताच सामाजिक संघटना व राजकीय पक्ष आक्रमक झाले. त्यामुळे अखेर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सर्व निर्णयाला स्थगिती दिली असून येत्या 6 फेब्रुवारीला सर्व संघटना व पक्षांची एकत्रित बैठक आयोजित केली असल्याची माहिती दिली.
कराड नगरपालिकेच्या चोवीस तास पाणी योजनेच्या बिलावरून गेल्या 15 दिवसापासून वादंग सुरू आहे. अनेक संघटना तसेच पक्षांनी या बिलाविरोधात आक्रमक भुमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. यावर आज निवेदन दिलेल्या संघटना, पक्ष यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक व चर्चेचे निमंत्रण पालिकेने दिले होते. परंतु सकाळी लोकशाही आघाडीने चर्चा केली. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी 15 टक्के तिमाही बिलावर सूट जाहीर केली. त्यानंतर संघटना व राजकीय पक्ष चांगलेच आक्रमक झाले होते. कराड पालिकेत दुपारी 2 नंतर अनेक सामाजिक संघटना, बाळासाहेबांची शिवसेना व काँग्रेसने 30 टक्के सवलतीची मागणी केली आहे. कराड पालिकेला राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटना अशी एकूण 10 निवेदने देण्यात आलेली आहेत.
कराड नगरपालिकेकडून 2007 सालापासून ही पाणी योजना अद्याप रखडली गेली आहे. गेल्या वर्षभरापासून ही योजना अमंलात आणण्यासाठी दिवसातून दोन वेळा मीटरप्रमाणे बिल आकारणी करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये अनेक नागरिकांना पाणीबिल दुप्पट, चाैप्पट आली होते. यावर पक्ष, संघटना यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. या प्रश्नावर लोकशाही आघाडीने 20 टक्के पाणी बिलात सूट देण्याची मागणी केली. तर काँग्रेस व बाळासाहेबांची शिवसेना यांच्या कडून कराडकराना 30 टक्के सवलत दिलीच पाहिजे अशी आग्रहाची मागणी केली. यावेळी काॅंग्रेस पदाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यात काही काळ जोरदार खटकेही उडाले. काॅंग्रेसचे शहराध्यक्ष ऋतूराज मोरे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश झाकीर पठाण, माजी शहराध्यक्ष राजेंद्र माने, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, फारूख पटवेकर यांच्यासह काॅंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झाकीर पठाण यांनी थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत मुख्याधिकारी यांना फोनच लावून दिला.
सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा गट आला. यामध्ये माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान यांनीही या निर्णयावर आक्षेप घेतला. तसेच यशवंत विकास आघाडीने पाणी बिलात 50 टक्के सूट देण्याची मागणी केली. या सर्व निर्णयावर आता 6 तारखेपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे.