‘मला हॉस्टेलच्या मेसची आठवण आली ‘, फ्लाइटमधील खराब जेवणामुळे संतप्त प्रवाशाने केली पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विमानाने प्रवास करताना अनेक वेगवेगळे लोक असतात. काही लोकांना विमानातील सुविधा आवडतात तर काही लोकांना त्या अजिबात आवडत नाही. याबद्दल ते त्या समस्यांबद्दल तक्रारी करत असतात. काही लोक तर आजकाल सोशल मीडियावर जाऊन देखील या तक्रारी करत असतात. अशीच एक घटना आता समोर आलेली आहे ती म्हणजे एका व्यक्तीला जेवण आवडले नाही. तर त्या व्यक्तीने थेट सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या फ्लाईटबद्दल तक्रार केली आहे.

विस्तारा फ्लाईटमध्ये कृपाल नावाचा एक व्यक्ती प्रवास करत होता. आणि यावेळी त्या व्यक्तीने सोशल मीडियावर जेवणाचा दर्जा अगदी खराब असल्याची तक्रार केलेली आहे. सोशल मीडियावर त्याने पोस्ट शेअर करत ही तक्रार केलेली आहे.

कृपाल यांनी विस्तारा फ्लाईटमध्ये अन्नसेवेच्या गुणवत्तेबद्दल तक्रार व्यक्त केलेली आहे. आणि ऑनलाईन युजर्स देखील त्याला पाठिंबा देत आहेत. कृपाल यांनी फ्लाईटमधील जेवणाचा एक फोटो एक्सवर पोस्ट केलेला आहे आणि उपहासात्मक भावनेने दिलेले आहे की, “वाह air vistara UK820 तुमच्या मेन कोर्सने तर माझ्या पूर्ण आठवणी जागा केल्या. एका हॉस्टेलच्या मेसच्या विस्कळीत कारभाराप्रमाणे हे सगळे जेवण दिलेले आहे. अत्यंत बेचव चिकनला पाहून तर असे वाटत होते की हे खूप वेळ आधीच खायला पाहिजे होते. अमेझिंग”

या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, ॲल्युमिनियम फॉईलचा एक डब्बा आहे. एका डब्यात हात आहे. तर दुसऱ्या डब्यात दुसरा पदार्थ दिसत आहे. त्यासोबत गुंडाळलेला बन आणि मिठाई देखील दिसत आहे. त्याची पोस्ट बघून विस्तारा यांनी त्याच्या पोस्टवर कमेंट केलेली आहे, त्यांनी लिहिलेले आहे की, “हाय कृपाल आम्ही आमचे सगळे जेवण चांगल्या क्वालिटीचा देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. परंतु तुमची निराशी पाहून आम्हाला खूप दुःख झालेले आहे. यानंतर त्यांनी त्याचा फोन नंबर तसेच फ्लाईट माहिती घेऊन त्याच्याशी संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केला आहे.”

त्याने केलेल्या पोस्टवर अनेक लोकांच्या कमेंट्स येत आहेत. एका युजरने लिहिलेले आहे की, “या लोकांनी मला बेबीकॉर्न सोबत एकदा पालक भात दिला होता” तर दुसऱ्या एक व्यक्ती म्हणाला, “त्यांची चिकन परिपूर्ण आहे.”