हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एसटी प्रवास करताना सुटे पैसे जवळ असणे फार गरजेचे असतात. ते नसले की हमखास त्या सुट्ट्या पैशांवरून कंडक्टर सोबत आपले वाद होतात. काही वेळा तर फक्त सुट्टे पैसे नसल्यामुळे कंडक्टर दिलेली रक्कम देखील परत करत नाहीत. त्यामुळे याला तोटा प्रवाशांना सहन करावा लागतो. मात्र आता एसटी प्रवाशांची या सगळ्या त्रासापासून सुटका होणार आहे. कारण, इथून पुढे प्रवाशांना एसटीने प्रवास करताना ऑनलाइन तिकीट काढता येणार आहे.
एसटी प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी महामंडळाने एक खास सोय आणली आहे. आता प्रवासी कंडक्टरला रक्कम न देता फोन पे, गुगल पे सारख्या ऍपचा वापर करून तिकीट काढू शकणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आता सर्व तिकिटांच्या मशीनमध्येच क्यू आर कोड जनरेट करणार आहे. ज्यामुळे प्रवासी कोणत्याही डिजिटल ऍप द्वारे क्यू आर कोड स्कॅन करुन तिकिट काढू शकतात. यामुळे कंडक्टरची मेहनती वाचणार आहे आणि प्रवास देखील सुलभ होणार आहे.
दरम्यान, सध्या देशांमध्ये डिजिटल पेमेंटची सुविधा वाढत चालली आहे. आता रिक्षाचालक, भाजीवाले, फेरीवाले सर्वजणच ऑनलाईन पेमेंटची सुविधा देतात. त्यामुळेच एक पाऊल पुढे घेत परिवहन महामंडळाने देखील डिजिटल पेमेंटची सुविधांची आहे. या सुविधेचा सर्वात जास्त फायदा कॉलेजच्या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच, यामुळे सुट्टया पैश्यांवरून होणारे वाद ही मिटणार आहेत.