नवी दिल्ली वृत्तसंस्था: योग गुरु रामदेव बाबा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले होते. एवढेच नव्हे तर त्यांच्या वादग्रस्त वक्ताव्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता रामदेव बाबा एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. देशात कोरोनाच्या लाटेबरोबर पसरणाऱ्या ब्लॅक फंगसवर आयुर्वेदिक औषध एका आठवड्याच्या आत लॉन्च करणार असल्याचा दावा रामदेव बाबांचे निकटवर्ती आचार्य बाळकृष्ण यांनी केला आहे.
औषधाच्या मंजुरीसाठी प्रयत्न
याबाबत बोलताना बाळकृष्ण यांनी सांगितलं आहे की पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि पतंजली योगपीठातील या औषधाच्या संदर्भातील काम आणि आवश्यक औपचारिकता जवळजवळ पूर्ण झाली आहे. ब्लॅक, व्हाईट आणि यलो फंगससाठी तयार करण्यात आलेल्या या औषधाचे शेवटच्या टप्प्यातील काम सुरू आहे. पुढे बोलताना बाळकृष्ण म्हणाले की, या औषधाचे संबंधित संशोधन पूर्ण झाला आहे आता त्याला मंजुरी मिळावी यासाठी औपचारिकता शासन स्तरावर पूर्ण केली जात आहे त्यांच्या मते यासाठी एक ते दीड आठवले लागू शकतात.
कोरोना सोबतच सध्या इतरही रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रामदेव बाबा यांनी म्हटले आहे की जास्त गंभीर इन्फेक्शन विरोधात लढण्यासाठी पतंजली रिसर्च सेंटर औषधनिर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. एका वृत्तानुसार यासाठी बालकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केंद्र प्रमुख डॉक्टर अनुराग वार्ष्णे यांच्या नेतृत्वाखाली एक संशोधन पद्धती या फंगल इन्फेक्शन विरोधात लढण्यासाठी विकसित केलेल्या औषधासाठी रिसर्च करणाऱ्या टीम सर रामदेवबाबा यांनी कौतुक केले आहे.
दरम्यान यापूर्वी देखील पतंजलींनी पहिला लाटे दरम्यान करोना विरुद्ध करून येणे औषध बाजारात आणलं होतं यावेळी करून त्यावर प्रभावी उपचार असा दावा पतंजली कडून करण्यात आला होता मात्र त्यानंतर यावरून वाद होण्याची चिन्हे दिसतात याला सपोर्टिंग मेडीलींक किंवा इम्मुनिटी बूस्टर असं नाव देण्यात आलं होतं आता ब्लॅक फंगस वर देखील औषध काढण्याची पतंजली ची तयारी सुरू आहे.