नवी दिल्ली । बुधवारी CSE तर्फे मधातील भेसळीसंदर्भात एक अहवाल देण्यात आला ज्यामध्ये असे म्हटले आहे की, आजकाल अनेक मोठे ब्रॅण्डस मधात भेसळ करत आहेत. ही बातमी नाकारतांना डाबर आणि पतंजली म्हणाले की हे दावे प्रवृत्त वाटतात आणि कंपनीची प्रतिमा डागाळण्यासाठी त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे म्हंटले आहे. या व्यतिरिक्त कंपन्यांनी सांगितले की, त्यांच्या कडून विकले जाणारे मध हे पूर्णतः भेसळ विरहित आहेत. ते नैसर्गिक गोष्टींपासून तयार केले जातात आणि त्यात साखर मिसळली जात नाही.
FSSAAI च्या नियमांचे पालन केले जाते
याबाबत माहिती देताना कंपनीने सांगितले की, आमचे प्रॉडक्ट्स पूर्णपणे शुद्ध आहेत. आमच्याकडून FSSAAI च्या सर्व नियमांचे पालन केले जात आहे. या अहवालावर बोलताना डाबर प्रवक्त्यांनी सांगितले की, “आमच्या ब्रँडसच्या प्रतिमेला कलंकित करणे हे या अहवालाचे ध्येय आहे.”
पतंजलीच्या डायरेक्टरने काय म्हटले?
पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनीही सांगितले की, हे केवळ आमचे प्रॉडक्ट्सला खराब करण्याचे षड्यंत्र आहे, जेणेकरून प्रक्रिया केलेल्या मधांना प्रोत्साहन दिले जाऊ शकेल. याशिवाय ते म्हणाले की, कॅपिटल आणि यंत्रसामग्रीच्या सहाय्याने येथे 100 टक्के शुद्ध मध तयार केले जाते. या व्यतिरिक्त FSSAAI चे सर्व निकष पूर्ण केले जातात.
CSE च्या अहवालात खुलासा झाला आहे
CSE ने बुधवारी एक अहवाल प्रसिद्ध केला असून यामध्ये CSE च्या महासंचालक सुनीता नारायण यांनी सांगितले की, भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणार्या जवळपास सर्व ब्रँडस त्यांच्या मधामध्ये साखरेच्या पाकची भेसळ करीत आहेत. त्याच संस्थेने 2003 आणि 2006 या वर्षात सॉफ्ट ड्रिंकमध्ये कीटकनाशकांच्या अस्तित्वाचा खुलासा केला होता.
शोधात हे तथ्य सापडल्याचा केला दावा
> 77 टक्के नमुन्यांमध्ये साखरेच्या पाकासहित इतर भेसळ आढळून आली.
> चाचणी झालेल्या 22 नमुन्यांपैकी केवळ पाचच सर्व चाचण्या उत्तीर्ण झाल्या.
> डाबर, पतंजली, बैद्यनाथ, झांडू, हितकरी आणि एपिस हिमालय यांसारखे सर्व प्रमुख ब्रँड्स एनएमआर चाचणीत फेल
> सफोला, मार्कफेड सोहना आणि नेचर ‘अमृत’ या 13 पैकी केवळ 3 ब्रँड्सचीच चाचणी उत्तीर्ण झाल्याचे आढळले.
> भारतामधून निर्यात होणार्या मधची एनएमआर चाचणी 1 ऑगस्ट 2020 पासून लागू करणे अनिवार्य केले गेले आहे, यावरून असे दिसते की, या भेसळ व्यवसायाबद्दल भारत सरकारला माहिती आहे, म्हणूनच त्यासाठी आधुनिक चाचण्यांची आवश्यकता आहे.
सीएसईच्या फूड सेफ्टी अँड टॉक्सिन टीमचे प्रोग्रॅम डायरेक्टर अमित खुराना म्हणाले की, आम्हाला जे सापडले ते धक्कादायक होते. भेसळ व्यापार किती विकसित झाला आहे हे यावरून लक्षात येते, जे भारतातील चाचण्यांमधून अन्न भेसळ सहजपणे पार केली जाते. आम्हाला यामध्ये असे आढळले आहे की, साखर सिरप अशा प्रकारे तयार केले गेले आहे की त्यांतील घटक ओळखता येणार नाहीत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.