Patanjali Electric Scooter : फक्त 14 हजारांत पतंजलीची इलेक्ट्रिक स्कुटर? 440 KM रेंजचा दावा

Patanjali Electric Scooter
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Patanjali Electric Scooter। भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पेट्रोलच्या खर्चापासून वाचण्यासाठी आणि पैसाची बचत करण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्राधान्य देत आहेत. वाढती मागणी बघता अनेक दुचाकी वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करत आहेत. त्यातच काही आठवड्यांपूर्वी, बाबा रामदेव यांच्या पतंजलीने फक्त १४००० रुपयांत इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्याची बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली. तस बघितलं तर पतंजली म्हंटल तर औषधे, साबण, सौंदर्यप्रसाधने इत्यादी आयुर्वेदिक उत्पादनांचा व्यवसाय करणारी कंपनी…. मग या कंपनीने इलेक्ट्रिक गाड्यांच्या मार्केट मध्ये पाऊल कस टाकलं? अगदी कमी पैशात स्कुटर कशी लाँच केली हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. त्यामुळे यामागची सत्यता पडताळणं गरचे आहे.

सर्वात आधी बघुयात व्हायरल बातमी आहे तरी काय? तर बातमीनुसार, पंतजलीच्या (Patanjali Electric Scooter) या स्कुटरचे वजन ७५-८० किलो आहे. पतंजलीची इलेक्ट्रिक स्कूटर एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ४४० किलोमीटरपर्यंत अंतर सहज पार करेल असं बोललं गेलं. त्यात लिथियम-आयन बॅटरी दिली असून ती रिमूव्हबल बॅटरी आहे. तुम्ही ती वेगळी करू शकता. म्हणजेच बॅटरी काढून स्वतंत्रपणे चार्ज करता येईल. हि बॅटरी चार्जिंग करण्यासाठी तुम्हाला ४ ते ५ तासांचा कालावधी लागेल, पण एकदा चार्ज केल्यास ती ४४० किलोमीटर रेंज देईल. तसेच ६० किमी प्रतितास हाय स्पीडने तुम्ही हि स्कुटर चालवू शकता. पण इथेही शंकेची पाल चुकचुकतेय.

हे खरोखर शक्य आहे का? Patanjali Electric Scooter

कारण आतापर्यंत भारतात कोणत्याही स्कूटरने ४४० किमीची रेंज दिलेली नाही. सिंपल वन नावाची कंपनी २४८ किमीच्या कमाल रेंजचा दावा करते आणि तेही फक्त कागदावर. दुसरीकडे, अल्ट्राव्हायोलेट टेसेरॅक्ट २६१ किमीची रेंज देते, पण ती एक बाईक आहे, स्कूटर नाही – आणि त्यात ६ किलोवॅट तासाची बॅटरी मोठी आहे. त्यामुळे प्रश्न असा उद्भवतो की पतंजलीने अशी कोणतीही तंत्रज्ञान विकसित केली आहे का जी इतर मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांना अजूनही करता आलेली नाही?अशा हाय-फाय स्पेसिफिकेशन ऐकल्यानंतर मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे हे खरोखर शक्य आहे का?

विचार करा, बाबा रामदेव त्यांच्या योगासनाच्या मध्यभागी इलेक्ट्रिक स्कूटरवर येतात आणि म्हणतात – “हे स्वावलंबी भारताचे प्रतीक आहे! यामुळे सोशल मीडियावर ट्रेंड झाला खरा पण हे एखाद्या अफवेसारखंच वाटतंय. महत्वाची बाब म्हणजे या स्कूटरबाबत पतंजलीकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. आणि जोपर्यंत कंपनी स्वतः पुढे येऊन त्याची माहिती देत नाही, तोपर्यंत पतंजलीच्या इलेक्ट्रिक स्कुटरवर विश्वास ठेवणं थोडं कठीणच आहे.