Patanjali Products Licence Cancel |रामदेव बाबांच्या आयुर्वेदिक पतंजली या कंपनीपुढे सतत काही ना काही अडचणी येत आहेत. त्या अडचणी कमी होण्याचे देखील नाव घेत नाहीये. फार्मसी अंतर्गत येणाऱ्या जवळपास 14 उत्पादनांचा परवाना बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे उत्तराखंड औषध विभाग प्राधिकरणाकडून या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. या कंपनीकडून करण्यात येणाऱ्या जाहिराती आणि त्यामधून सर्वसामान्य लोकांची दिशाभूल केली जाते. यासंदर्भात ही कारवाई करण्यात आलेली आहे.
या उत्पादनावर घातली बंदी | Patanjali Products Licence Cancel
त्यामुळे आता सरकारी आदेशानंतर दिव्य फार्मसीच्या ज्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामध्ये अनेक उत्पादनाचा समावेश आहे. यामध्ये पतंजली दृष्टी आय ड्रॉप, मध, अश्विनी वटी एक्स्ट्रा पावर, मुक्तावटी एक्स्ट्रा पावर, लिपिडोक बीपी, ग्रेट मधु, लिवामृत ॲडव्हान्स, लेवो ग्रिट, आयग्रेट, गोल्ड श्वासारी, प्रवाही श्वासारी अवले हा आणि श्वासारी गोल्ड श्वासारीवटी या गोष्टींचा समावेश आहे. यामध्ये आता आयजीएसटी या विभागांनी एकात्मिक वस्तू आणि सेवा कर कायदा 2017 च्या कलम 20 सह केंद्रीय वस्तू आणि सेवा कायदा 2017 उत्तराखंड राज्य वस्तू आणि सेवा कायदा 2017 ही नोटीस बजावली आहे.
योग गुरु रामदेव बाबा यांच्या अंतर्गत चालवलेल्या या पतंजली आयुर्वेदिक (Patanjali Products Licence Cancel) कंपनीला चंदिगड झोनल विभागात येणाऱ्या जीएसटी यांच्याकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पतंजली फूड्सला जीएसटी विभागाकडून कारणे दाखवा ही नोटीसही आलेली आहे. जिथे कंपनीकडून 27.46 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स का घेऊ नये या संदर्भात देखील विचारणे आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केली कानउघडणी
पतंजलीने ज्या उत्पादनाची जाहिरात केली, त्या उत्पादनाचा माफीनामा वृत्तपत्रांमध्ये असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला चुकीची पुनरावृत्ती होणार नसल्याचे आश्वासन देखील देण्यात आलेले होते. परंतु वृत्तपत्रांमध्ये आलेला माफीनामा उत्पादनांच्या जाहिराती इतकाच होता का? अशा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीला विचारलेले आहे. त्यामुळे आता पतंजलीवर मोठे संकट आलेले आहे. आणि त्यांच्या 14 प्रोडक्टवर आता बंदी घालण्यात येणार आहे.