Patbandhare Vibhag Recruitment 2024 | पाटबंधारे विकास महामंडळात वकील पदासाठी मोठी भरती सुरु, असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Patbandhare Vibhag Recruitment 2024  | पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे अंतर्गत मोठी भरती निघाली आहे. या विभागाअंतर्गत वकील या पदाच्या रिक्त जागा आहेत. त्या रिक्त जागा भरण्यासाठी आता ही भरती केली जाणार आहे. ही भरती विविध शहरांमध्ये असणार आहे. त्यामुळे आता नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. तर त्या उमेदवारांना अर्ज कसा करायचा? कुठे करायचा? त्यासाठी पात्रता काय असणार आहे? या सगळ्याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.

पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे यांच्या अंतर्गत वकील या पदासाठी भरती सुरू आहे. ही भरती रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक यांसारख्या ठिकाणी केली जाणार आहे.

निवड प्रक्रिया

  • या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • अर्ज आणि अनुभव याला एकूण 40 मार्क्स असतील.
  • त्याचप्रमाणे मुलाखतीस 60 मार्क्स असतील
  • एकूण 100 मार्कांची ही निवड प्रक्रिया असेल.
  • जो उमेदवार किमान 50 टक्के गुण मिळवून प्राप्त होईल त्याची या पदासाठी निवड होणार आहे.

पात्रता | Patbandhare Vibhag Recruitment 2024 

उमेदवाराकडे वकिली क्षेत्रात किमान 5 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कम्प्युटर सिस्टीम, ई-मेल, इंटरनेटचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

अर्ज कुठे व कसा करायचा

  • वकील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अर्जाचा फॉर्म भरून ईमेलद्वारे पाठवायचा आहे.
  • अर्जाचा फॉर्म नोकरीच्या सूचनेमध्ये दिलेला आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे. त्यामुळे या तारखेच्या आधीच तुम्ही अर्ज करा अन्यथा तुमच्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.