नवी दिल्ली । खासगी क्षेत्रातील बँकांमधील मालकी हक्क संबंधीच्या गाइडलाइंस आणि कॉर्पोरेट स्ट्रक्चरचा अहवाल आरबीआयच्या इंटर्नल वर्किंग ग्रुप (Internal Working Group of RBI) जारी केला आहे. यातूनच देशात नवीन खासगी बँका सुरू करण्याचा मार्ग दिसून येत आहे. 12 जून, 2020 रोजी, रिझर्व्ह बँकेने इंटर्नल वर्किंग ग्रुप स्थापन केला.
NBFC ला बँकेत रूपांतरित करण्याची शिफारस
या इंटर्नल वर्किंग ग्रुपने असे सूचविले की, काही निकषांची पूर्तता केल्यास मोठी नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी बँकेत (Non-Banking Financial Company) रुपांतरित केली जाऊ शकते. अंतर्गत वर्किंग ग्रुपच्या सूचनेनुसार 50,000 कोटींपेक्षा जास्त भांडवल असलेली आणि दहा वर्षांचा व्यवसाय पूर्ण झालेल्या NBFC ला बँकेत रुपांतर करता येईल.
3 वर्ष पूर्ण केलेल्या पेमेंट्स बँकांना स्मॉल फायनान्स बँकेत बदलण्याची सूचना
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या इंटर्नल वर्किंग ग्रुपने असे सुचवले आहे की, 3 वर्षांचा अनुभव असलेल्या पेमेंट्स बँकांना स्मॉल फायनान्स बँकांमध्ये रुपांतरित करता येईल.
इंटर्नल वर्किंग ग्रुपच्या इतर शिफारसी
> बँकेच्या प्रोमोटर्सची हिस्सेदारी सध्याच्या 15% वरून 26% पर्यंत वाढवण्याची शिफारस
> बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 मध्ये दुरुस्तीनंतर मोठ्या कॉर्पोरेट आणि इंडस्ट्रियल हाउसेसना बँकांचे प्रोमोटर्स म्हणून परवानगी देण्यात यावी.
> नवीन बँकांसाठी लागणारे भांडवल 500 कोटींवरून वाढवून 1000 कोटी रुपये केले पाहिजे.
> स्मॉल फायनान्स बँकेचे भांडवल 200 कोटी वरून 300 कोटी केले पाहिजे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.