Paytm Gas Cylinder Booking | आपल्याला जेव्हा गॅस सिलेंडर आणायचा असतो. त्यावेळी अनेकवेळा आपल्याला तिथे जाऊन लाईनमध्ये उभे राहावे लागते. जर तुम्ही देखील आता घरबसल्या गॅस सिलेंडर बुक करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक युक्ती सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी घरबसल्या गॅस सिलेंडर बुक करू शकता. आणि यावर तुम्हाला कॅशबॅक देखील मिळेल. यावेळी तुम्हाला गॅस सिलेंडरचा ऑप्शन देखील उपलब्ध असतो. तुम्हाला जर घर बसल्या गॅस सिलेंडर बुक करायचा असेल, तर खालील काही टिप्स फॉलो करा. ज्याच्या मदतीने तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू (Paytm Gas Cylinder Booking) शकता. आणि पहिल्या महिन्याच्या तीन रिचार्जवर कॅशबॅक देखील ऑफर दिली जाते.
पेटीएमने सांगितल्याप्रमाणे ही ऑफर केवळ मोबाईल डीटीएच रिचार्ज, मोबाईल रिचार्ज, गॅसपेमेंट आणि गॅस सिलेंडर बुकिंगवर लागू होते. या अंतर्गत जर तुम्ही बिल भरले, तर तुम्हाला 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळू शकतो. ही ऑफर प्रत्येक युजरला वेगळी असू शकते. आणि कॅशबॅकची रक्कमही वेगळी असू शकते. परंतु या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही 48 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट करणे गरजेचे आहे.
तुम्ही ॲमेझॉन पेच्या (Paytm Gas Cylinder Booking) मदतीने देखील पेमेंट करू शकता. यामध्ये तुम्हाला ऑफरही मिळते. ॲमेझॉनवरून जर तुम्ही गॅस बुक केला, तर तुम्हाला 50 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळतो. यासोबतच तुम्हाला गॅस एजन्सीला कॉल करून वेळ वाया घालवण्याची देखील गरज नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला कॅशबॅक देखील मिळतो.
घरबसल्या ऑनलाइन गॅस बुकिंगचे इतर पर्याय | Paytm Gas Cylinder Booking
तुम्ही जर घर बसल्या गॅस सिलेंडर बुक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही मेसेजद्वारे देखील बुक करू शकता. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गॅस एजन्सीला मेसेजद्वारे गॅस बुक करण्यासाठी क्रमांक घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये गॅस एजन्सीचे नाव स्पेस एसटीडी कोड आणि वितरणाचा फोन नंबर लिहून पाठवावा लागेल.
तुम्ही गॅस सिलेंडर व्हाट्सअप ॲप वरून देखील बुक करू शकता यासाठी तुम्हाला whatsapp वर जाऊन रिफील करायचे आहे त्यानंतर तुम्हाला हा मेसेज 7588888824 या नंबरवर पाठवायचा आहे. त्यानंतर त्यांनी दिलेल्या स्टेप्स फॉलो करा आणि तुमचा गॅस सिलेंडर बुक होईल.