PCMC Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी भरती सुरु, दरमहा मिळणार 70 हजार रुपये पगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PCMC Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या तरुणांसाठी एक नवीन संधी आलेली आहे. ती म्हणजे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांवर भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

रिक्त पदांचा तपशील

पिंपरी चिंचवड महानगरपालिके (PCMC Bharti 2024) अंतर्गत सल्लागार या पदाची भरती होणार आहे. या पदाची 1 रिक्त जागा आहे. ती जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.

अर्ज करण्याची पद्धत | PCMC Bharti 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत होणारी ही भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणजेच उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Bharti 2024)अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर 4 मार्च 2014 हा शेवटचा दिवस आहे. आता यासाठी थोडेच दिवस राहिलेले आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरा

अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना मुलाखत द्यावी लागणार आहे त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर 5 मार्च 2024 रोजी हजर राहायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

उमेदवार अर्ज माननीय आयुक्त यांचे नावे पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कै .नारायण मेघाजी लोखंडे सभागृह, कामगार भवन नेहरूनगर रोड पिंपरी 18

निवड प्रक्रिया

अर्ज केल्यानंतर उमेदवारांना मुलाखत द्यावी लागणार आहे. याकरता उमेदवारांना मा. स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत, जुना पुणे मुंबई रोड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी 18 या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

मासिक वेतन

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत (PCMC Bharti 2024) सल्लागार या पदावर ज्या उमेदवाराची निवड होईल त्या उमेदवाराला तर महिन्याला 70 हजार रुपये एवढे वेतन मिळणार आहे.