‘या’ Penny Stock ने गेल्या 20 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात केली 150 पटींनी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stock : गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर म्हणून उदयास आले आहेत. शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी अगदी कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. ज्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याआधी प्रत्येकाला भविष्यात मोठा नफा कमावून देणाऱ्या पेनी स्टॉकविषयीची माहिती हवी असते. जर आपणही अशाच पेनी स्टॉकच्या शोधात असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. मात्र, हे ध्यानात घ्या कि, Penny Stock मध्ये गुंतवणूक करणे धोकादायक मानले जाते. असे स्टॉक कोट्यवधी रुपये मिळवून देत असले तरीही त्यामध्ये पैसे बुडण्याचा धोकाही जास्त असतो. आज आपण अशाच एका पेनी स्टॉकबाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने कमी कालावधीत गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे.

Stock Market Today: Stocks Close Higher After Terrible Tuesday | Kiplinger

आज आपण ज्या कंपनीच्या शेअर्सबाबत चर्चा करणार आहोत त्याचे नाव Kaiser Corporation असे आहे. हे लक्षात घ्या कि, BSE वर लिस्टेड असलेल्या या शेअर्सने अवघ्या 20 महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपये मिळवून दिले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 1,312.16 टक्के इतका जबरदस्त रिटर्न दिला आहे. Penny Stock

Kaiser Corporation share delivered 20000 percent return in one year 1 lakh  turn to 2 crore rupees - Business News India - 39 पैसे का शेयर 78 रुपये का  हुआ, सालभर में 1 लाख का निवेश बन गया ₹2 करोड़

1 लाखाची गुंतवणूक दीड कोटी केली

मे 2021 मध्ये 35 पैसे किंमत असलेले हे शेअर्स आज 52.25 रुपयांच्या पातळीवर आहेत. गेल्या 20 महिन्यांच्या कालावधीत या शेअर्सच्या किंमती 150 पटीने वाढल्या आहेत. जर एखाद्याने मे 2021 मध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याच्या गुंतवणूकीचे मूल्य 1.5 कोटी रुपये झाले असते. Penny Stock

करोड़पति स्टॉक: 10 रु से कम के इन 5 शेयरों ने बनाया अमीर, 200 गुना तक बढ़ाए  पैसे

कंपनीचा रेकॉर्ड जाणून घ्या

Kaiser Corporation च्या शेअर्सचा रेकॉर्ड चढ-उतारांनी भरलेला आहे. या कंपनीच्या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा विक्रमी उच्चांक 130.55 रुपये आहे तर गेल्या 52 आठवड्यांचा विक्रमी नीचांक रुपये 3.37 आहे. मात्र गेल्या 6 महिन्यांत या शेअर्समध्ये जवळपास 50 टक्क्यांनी घसरण झाली आहे. जुलै 2022 मध्ये103.25 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 52.25 रुपयांच्या पातळीवर आहेत. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 9 टक्क्यांची घसरण झाल्याचे पहायला मिळते आहे. Penny Stock

Indian Currency In A White Background Stock Photo - Download Image Now -  Indian Currency, Stock Market Data, India - iStock

Kaiser Corporation च्या व्यवसायाबाबत जाणून घ्या

Kaiser Corporation Limited (KCL) या स्मॉल कॅप कंपनीची मार्केट कॅप 275 कोटी रुपये आहे. ही कंपनी लेबल, स्टेशनरी आर्टिकल्स, मासिके आणि कार्टनच्या व्यवसायात गुंतलेली आहे. याशिवाय, कंपनी तिच्या उपकंपन्यांद्वारे इंजिनिअरिंग गुड्स, इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल हीट ट्रेसिंग प्रोजेक्टमध्ये देखील काम करते. 1993 मध्ये सुरू झालेली ही एक भारतीय कंपनी आहे. मार्च 1995 मध्ये, Kaiser प्रेस लिमिटेडची पब्लिक लिमिटेड कंपनी बनली. तसेच 2013 मध्ये कंपनीचे नाव बदलून Kaiser Corporation Limited असे करण्यात आले.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/kaiser-corporation-limited/kacl/531780

हे पण वाचा :
FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या
अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट
Car च्या डिक्कीत ठेवा ‘हे’ Device; पंक्चर टायर एका मिनिटांत होईल ठीक
Gold Price : गेल्या आठवड्याभरात सोने महागले तर चांदीची चमक पडली फिकी, नवीन वर्षात काय होईल ते जाणून घ्या