मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या सोशल मीडियावर मुले चोरणाऱ्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत असतात. याच भीतीमुळे आजकाल नागरिकांना गैरसमज ही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. ठाण्याच्या दिव्यात अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीवर मुले चोरणारा असा संशय घेत जमावाने त्याला मारहाण (people beaten youth) केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
दिवा शहरातील मुंब्रा येथील कॉलनीमध्ये एक हॉटेल कर्मचारी चिकन घेण्यासाठी चिकनच्या दुकानात उभा होता. दरम्यान त्यांनी तिथे असलेल्या काही मुलांकडे पाहिले. त्यामुळेच हा व्यक्ती मुले चोरत असावा असा गैरसमज लोकांमध्ये पसरला आणि त्यानंतर तिथल्या नागरिकांनीच त्याला बेदम मारहाण (people beaten youth) केली. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो त्या व्यक्तीला एक दोन नव्हे तर शेकडो लोकांनी मिळून मारहाण (people beaten youth) केली आहे.

या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या संपूर्ण घटनेवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत (people beaten youth) संबंधित व्यक्ती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!