माणसं जशी ८ तास काम करतात तशी लहान मुलं सतत ८ तास शिकतच असतात – डॉ श्रुती पानसे

उपस्थित पालक आणि मुलांना मार्गदर्शन करताना मेंदू समुपदेशक डॉ श्रुती पानसे
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी। आजचे पालक म्हणतात आमची मुलं अभ्यासच करत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्या आसपास घडणाऱ्या नवनव्या गोष्टींची उत्सुकता आणि त्यांना पडणारे प्रश्न यातून ते २४ तासातून सरासरी सलग आठ तास शिकतच असतात असे प्रतिपादन डॉ. श्रुती पानसे यांनी केले. मेंदूशी मैत्री समुपदेशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुल वाढवताना समोर येणारी आव्हाने आणि मोबाईलचे मेंदूसंबंधी व आरोग्याबाबतचे धोके सांगून पालकांनी मुलांना मोबाईल पासून दूर ठेवावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत होटकर आणि सुनील शेवरे यांनी केले होते. डायस प्लॉट भागातील समाजमंदिरात कार्यक्रम संपन्न झाला.

लहान मुल दिवसभर काय खातात त्याच्यावर त्यांचा मेंदू चालत असतो. बाहेरचे पदार्थ म्हणजेच चटपटीत पदार्थ खाल्ल्याने मेंदूवर थेट परिणाम कसा होतो वेफर्स चिप्स मध्ये जी केमिकल्स असतात ते मेंदूसाठी अजिबात चांगली नसतात आणि विशेष म्हणजे आपली मुले दिवसभर पाणी किती पितात त्याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं अशा अनेक बाबींकडे लक्ष वेधून याविषयी पालकांशी संवाद साधला.

हल्ली लहान मुलांना आणि मोठ्याना सगळ्यांनाच लागलेलं मोबाईलचे व्यसन या गंभीर विषयावर सुद्धा मार्गदर्शन केले. म्हातारपणापर्यंत मेंदू चांगला राहायला हवं अस वाटत असेल तर डोळे जपण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून साम प्रतिनिधी सोलापूर विषवभूषण लिमये उपस्थित होते. सामजिक क्षेत्रातील महिला जयश्री त्रिभुवन, श्वेता होनराव – कामठे आणि घोरपडे पेठेतील अभ्यासिका विद्यार्थी समिती अध्यक्ष ओंकार मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत होटकर तर आभार प्रदर्शन सुनील शेवरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी मुन्ना इनामदार, निखिल कांबळे, संदीप पुटगे, सूर्यकांत होटकर, प्रकाश कुंबळे, कुणाल कदम, ओंकार मोरे,सूरज कांबळे, सचिन कोतली, नवा डुबेकर यांनी सहकार्य केले.