व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पाटण तालुक्यातील प्रत्येक गावात आज बारमाही रस्ते : आ. शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील 130 गावे, वाड्या वस्त्यांवर बारमाही रस्ते नव्हते. आज अपवाद वगळता तालुक्यातील प्रत्येक गावात बारमाही रस्ते झाले आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील माजगाव – उरुल या राज्य अर्थसंकल्पीय तरतूदीतील रस्त्याचे आज भूमिपूजन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, माजगाव व उरुल गावातील पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थांनी पार पडलेल्या भूमिपूजन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

पालकमंत्री देसाई म्हणाले, या परिसरात पाऊस झाला की गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे या भागात बारमाही रस्ते होणे गरजेचे होते. आज तालुक्यात सर्वत्र बारमाही रस्ते आहेत. वीज, पाणी या मुलभूत सोयीही करण्यात आल्या आहेत. आज जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी जनता नेहमीच साथ देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.