हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सतत वाढणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या दराने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आज काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने खाली उतरल्या असून भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 66 पैशांनी कमी झाले आहे. पेट्रोल पाठोपाठ डिझेलच्या दरातही 64 पैशांची घसरण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पेट्रोलचे नवे दर प्रतिलिटर 105.96 रुपये आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 92.49 रुपयांवर आले आहेत.
या नव्या दरानुसार हिमाचल प्रदेशात पेट्रोल 0.68 पैशांनी महागले असून पेट्रोलचा भाव प्रतिलिटर 95.74 रुपयांवर पोहचला आहे. त्याचवेळी डिझेल 0.58 पैशांनी वाढून 81.99 रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थानमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. राजस्थानमध्ये पेट्रोल 0.53 रुपयांनी तर डिझेल 0.48 रुपयांनी स्वस्त झाले आहे. दोन्हीच्या किमती अनुक्रमे 93.35 रुपये प्रति लिटर आहेत. देशातील 4 महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
चार शहरात असे आहेत पेट्रोल डिझेलचे नवे दर
1) दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
2) मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
3) चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
4) कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर