Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणार मोठी घट; सरकारकडून जनतेला नव्या वर्षाचं गिफ्ट?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Petrol Diesel Price । देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्किल झालं आहे. खाद्यपदार्थपासून ते सर्वच जीवनावश्यक्य वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने जनतेच्या खिशाला चांगलाच चाप बसत आहे. परंतु आता देशभरातील नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकार लवकरच पेट्रोल- डिझेलचे दर कमी करू शकते. त्याबाबत हालचालीना वेग आला असून केंद्र सरकार (Central Government) तेल कंपन्यांशी बोलणी करत आहे. सरकार आणि तेल कंपन्यांसोबत यशस्वी बोलणी झाली तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 8-10 रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात.

मागील वर्षी 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे दर हे जैसे थे पहायला मिळत आहेत. आता पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याबाबत देशाचे अर्थ मंत्रालय आणि पेट्रोलियम मंत्रालय चर्चा करत आहेत. याशिवाय तेल कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे. सर्व काही व्यवस्थित बोलणी झाली तर येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 8-10 रुपयांची कपात होईल. त्यामुळं सर्वसामान्य जनतेला हा सर्वात मोठा दिलासा मिळेल.

कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आईलचे दर 80 डॉलर प्रती बॅरल आहे. हे कच्चे तेल पेट्रोल आणि डिझेल बनवण्यासाठी रिफायनरीमध्ये पाठवले जाते. परंतु गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या किमती उतरल्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कमी करून जनतेला दिलासा देण्याचे काम केंद्र सरकार करेल. असं झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा हा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक असेल.

यापूर्वी शिंदे सरकारने केल्या होत्या किमती कमी – Petrol Diesel Price

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेलवर लावण्यात येणाऱ्या व्हॅटच्या दरात कपात केली होती. परिणामी त्यावेळी पेट्रोल प्रती लिटर पाच रुपये तर डिझेल प्रती लिटर तीन रुपये स्वस्त झालं होते. आता असाच निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतल्यास जनतेला मोठा फायदा होणार आहे.