पेट्रोल-डिझेलसह महागाईपासून नागरिकांची होणार सुटका; मोदी सरकारची मोठी तयारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी नागरिकांचे जगणेच हैराण करून टाकले होते. परंतु, आता देशात लवकरच या पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार आहेत. देशातील पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी मोदी सरकारकडून (Modi Government)  हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मोदी सरकारने या संबंधित आखलेल्या नवीन योजनेमध्ये, तब्बल 1 कोटी रुपये मंत्रालयांच्या बजेटमधून री- अॅलोकेट केले जाणार आहेत. ही रक्कम खाद्यपदार्थ आणि फ्यूअलच्या वाढत्या किमतींवर आळा बसवण्यासाठी वापरण्यात येईल. ज्यामुळे देशातील महागाई दूर होण्यास मदत होईल.

ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात सरकार लोकल गॅसोलीन सेल्सवरील टॅक्स कमी करणे, तसेच खाद्य तेल आणि गव्हावरील आयात शुल्क कमी करणे या गोष्टींवर जास्त भर देणार आहे. गॅसोलीन सेल्सवरील टॅक्स कमी केल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमती देखील उतरल्या जाऊ शकतात. मुख्य म्हणजे, यासंदर्भात लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nandra Modi) यांच्याकडून एक मोठा निर्णय घेण्यात येईल.

आगामी निवडणूकांची तयारी

15 ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी यांनी महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा संकल्प आपल्या भाषणात केला. यानंतर केंद्र सरकारकडून यासाठी काम देखील सुरू करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वाढत्या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. महत्वाचे म्हणजे, आता लवकरच लोकसभा निवडणूका होणार असल्यामुळे मतदारांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास सरकारने सुरुवात केली आहे. त्यामुळे या काळात पेट्रोल डिझेलच्या किमती देखील कमी करण्यावर सरकार भर देऊ शकते. तसेच यामुळे महागाई घटू शकते.

दरम्यान, गेल्या आठवड्यातच आरबीआयने रेपो रेट पूर्ववत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया खंडातील व्याजदरांपैकी भारतातील व्याजदर सर्वाधिक आहे. अशातच सरकार तेलावरील टॅक्स कमी करण्याचा विचार करत असल्यामुळे, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईलच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. पुढे जाऊन जर, पेट्रोल डिझेलच्या किमती कमी झाल्या तरी याचा फटका ऑइल कंपन्यांना बसू शकतो.