Sunday, May 28, 2023

Petrol Diesel Price : नववर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना मोठा झटका, पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आजपासून नववर्षाला सुरुवात होत आहे. नेहमीप्रमाणे 1 जानेवारी रोजी सरकारी तेल कंपन्यांनी (Petrol Diesel Price)  देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. या नव्या दरानुसार देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींत मोठा बदल झाला आहे. आज भारतातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसत आहे.

केरळमध्ये पेट्रोल 0.72 रुपयांनी वाढल्यानंतर 102.63 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचवेळी डिझेलचा दर 0.67 रुपयांनी वाढून 95.44 रुपये प्रति लिटर झाला आहे. याशिवाय पंजाबमध्ये पेट्रोल 96.89 रुपये आणि डिझेल 87.24 रुपये झाले आहे. उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान, महाराष्ट्र आणि गोव्यासह इतर काही राज्यांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) बऱ्यापैकी वाढ झाली आहे.

देशातील प्रमुख शहरातील तेलाचे दर
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर होतात
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळे पेट्रोल- डिझेलच्या किमतीत वाढ (Petrol Diesel Price) होत असते.

SMS वरदेखील जाणून घेऊ शकता दर
पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेदेखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून चालू दराची (Petrol Diesel Price) माहिती घेऊ शकतात. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकता. तर, HPCL ग्राहक HP Price आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून आता चालू असणाऱ्या दराची माहिती घेऊ शकता.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!