आता बाळ झाल्यावर आईप्रमाणंच वडिलांनाही मिळणार 12 आठवड्यांची सुट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसूती काळात आणि त्यानंतर बाळाच्या आईला महिला नोकरदाराला १२ आठवड्याची भरपगारी रजा दिली जाते. तर राज्यात महिला शासकीय कर्मचाऱ्यांना 2017 च्या शासन निर्णयान्वये 180 दिवसापर्यंत “विशेष रजा”अनुज्ञेय करण्यात आलेली आहे. मात्र, आता आईप्रमाणे बाळाच्या वडिलांनादेखील अशी रजा घेता येणार आहे. प्रसिद्ध असलेल्या फायझर कंपनीने त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय घेतला असून वडील झाल्यावर कर्मचाऱ्यांना 12 आठवड्यांची सुट्टी दिली जाणार आहे.

पॅटर्निटी लिव्ह अंतर्गत फायझर कंपनीत मोठा संख्येने कर्मचारी काम करत आहेत. कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले जातात. काम कंपनीच्यावतीने एक मोठा निर्णय घेण्यात आला असून काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना बाप झाल्यास चार टप्प्यामध्ये ही पॅटर्निटी लिव्ह मिळणार आहे. तसेच बायोलॉजिकल बाळांच्या वडीलांनाही ही 12 आठवड्यांची सुट्टी लागू होणार आहे. याबाबत अधिकृत धोरण फायझर कंपनीने गुरुवारी जाहीर केले आहे.

कंपनीकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कमीत कमी दोन आठवडे आणि जास्तीत जास्त सहा आठवड्यांपर्यंत कर्मचाऱ्यांना सुट्टी घेता येणार आहे. तर 12 आठवड्यांची पितृत्व रजा पॉलिसीमुळे पुरुष सहकाऱ्यांना आणि त्यांच्या जोडीदाराबरोबर पालकत्वाचा आनंद घेता येणार आहे.

फायझर इंडियाचे डायरेक्टर पीपल एक्सपिरिअन्स शिल्पी सिंह यांनी पॅटर्निटी लीव्हवर कंपनीचे मत मांडले आहे. ‘फायझरमध्ये, आम्ही जे काही करतो त्याचे सगळे लक्ष हे कर्मचारी असतात. आमचा विश्वास आहे की प्रगतीशील कार्यक्षेत्राचे भविष्य म्हणजे सगळ्यात आधी कर्मचाऱ्यांचा विचार करायचा. 12-आठवड्यांची पितृत्व रजा पॉलिसी आमच्या पुरुष सहकाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नींना पालकत्वाचा अनुभव आणि आनंददायक क्षण जपण्यास नक्कीच मदत करेल.’

महिला नोकरदारांना 12 आठवड्यांची भरपगारी रजा

कामगार कायद्यानुसार प्रसूती काळात महिला नोकरदारांना 12 आठवड्यांची भरपगारी रजा मिळते, प्रसूती आणि त्यानंतरच्या काळात आईसह बाळाला विश्रांती मिळावी अन् बाळाच्या आरोग्याच्या, संगोपनाच्या दृष्टीने ही रजा आता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.