‘भाईगिरीचा’ नाद भोवला.. तलवार,कुकरिसह स्टेटस ठेवताच गुन्हेशाखेने आवळल्या मुसक्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | तलवार आणि कुकरी सह फोटो काढून तो सोशल माध्यमावर स्टेटस ठेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन ‘भाई’च्या गुन्हेशाखेने मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी दोन धारदार तलवारी आणि एक कुकरी जप्त केली. ही कारवाई आज संध्याकाळी करण्यात आली.
सुभाष भगवान पवार वय-24 (रा.म्हाडा कॉलोनी, हर्सूल), अर्जुन ईश्वरसिंग पोहाळ वय-32 (रा.आनंदनगर, गारखेडपरिसर), आदित्य रमेश गायकवाड वय-20 (म्हाडा कॉलोनी, हर्सूल) अशी गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तिन्ही आरोपिना ‘भाईगिरी’चे आकर्षण होते. परिसरात आपलीच दहशत असावी असे त्यांना वाटायचे. याच अकर्षणापोटी या आरोपीनी धारदार तलवार व कुकरीसह फोटो काढून ते फोटो व्हाट्सअप्प या सोशल माध्यमाच्या स्टेटसवर ठेवले होते.मात्र हीच बाब गुन्हे शाखेच्या पथकाला कळाली. पोलिसांनी सापळा रचत तिन्ही कथित ‘भाई’च्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई साह्ययक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, यांच्या मार्गदर्शनाखाली साह्ययक निरीक्षक मनोज शिंदे, हवलंदार संतोष सोनवणे,चंद्रकांत गवळी,भगवान शिलोटे,विशाल पाटील, आनंद वाहुळ आदींच्या पथकाने केली.