कोल्हापूर प्रतिनिधी । नेहमी सफेद काठी आणि कोणाच्या तरी हाताचा आधार घेऊन चालणारे दिव्यांग व्यक्ती आपण पहिले असतील. पण कोल्हापूरात सावली फाऊंडेशनने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांगांना ऍडव्हेंचरचा थरार अनुभवायास मिळाला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद झळकत होता.
झिप लाईन, वॉल क्लाइम्बिंग यासारख्या गोष्टी या विद्यार्थ्यांनी लीलया पार केल्या. पन्हाळ्याच्या कुशीत वसलेल्या या ऍडव्हनेचर पार्कचा थरार अनुभवताना पन्हाळागडावरील ऐतिहासिक शौर्याची कहाणी त्याच्या नजरेमसमोर आणली गेली. यावेळी विद्यार्थ्यांनी या ऍडव्हेंचरचा थराराचा त्यांना आलेला अनुभव व्यक्त केला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील चैतन्य पाहण्यासारखे होते.