Friday, March 24, 2023

PIB Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप, तपासा ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्यता

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | PIB Fact Check : सध्या सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड प्रमाणावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये केंद्र सरकारकडून मोफत लॅपटॉपचे वाटप केले जाणार असल्याचे सांगितले जाते आहे. तसेच हा मोफत लॅपटॉप मिळवण्यासाठी आपल्याला फक्त एका लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल, असा दावा देखील या मेसेजमध्ये केला जातो आहे. मात्र आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सरकारने या मेसेजच्या सत्यतेशी संबंधित काही माहिती शेअर केली आहे.

The embarrassment that is PIB Fact Check: Who fact-checks this 'fact checker '?

- Advertisement -

भारत सरकारची प्रेस एजन्सी असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) या व्हायरल मेसेजमागची सत्यता तपासली आहे. आपल्या तपासणीत PIB ने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. आपल्या अधिकृत अकाउंटवरून पीआयबीने ट्विट करत म्हंटले की, सध्या सोशल मीडियावर तरुणांना मोफत लॅपटॉप देण्याचा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होतो आहे. तसेच लॅपटॉप बुक करण्यासाठी यामधील लिंकवर क्लिक करून आपले वैयक्तिक तपशील देण्यात सांगितले जाते आहे. PIB Fact Check

PIB ने मैसेज को बताया फर्जी
(फोटो- twitter.com/PIBFactCheck)

PIB ने ट्विट करत म्हंटले कि…

याबाबत पीआयबीने पुढे सांगितले की, व्हायरल होत असलेली लिंक आणि मेसेज पूर्णपणे बनावट आहे. ज्यामुळे आपली वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्या.

How to fake news fact check website pibfactcheck in is falsely claiming to  be the official website of pibfactcheck | Fake News की फैक्ट चेक करने वाली  सरकारी एजेंसी PIB को भी

सरकारशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या बातम्यांबाबत इथे करा तक्रार

सरकारशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या कोणत्याही बातमीची सत्यता जाणून घेण्यासाठी PIB Fact Check ची मदत देखील घेता येईल. यासाठी PIB Fact Check ला अशा बातम्यांचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा URL WhatsApp नंबर 918799711259 वर पाठवता येईल किंवा http://pibfactcheck@gmail.com वर मेल करता येईल. PIB Fact Check

हे पण वाचा :
New Business Idea : फर्निचरच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये !!!
Jio च्या ‘या’ नवीन प्लॅनमध्ये 252 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळणार डेली 2.5GB डेटा
FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या
अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट