Sunday, March 26, 2023

PIB factCheck : केंद्र सरकारकडून ‘या’ योजनेंतर्गत सर्व मुलींना मिळणार 1.50 लाख रुपये, यामागील सत्यता तपासा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB factCheck : केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. ज्या अंतर्गत गरीब आणि गरजू मुलींसाठी आर्थिक मदत केली जाते. आजकाल सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सरकार प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजनेअंतर्गत सर्व मुलींना 1.50 लाख रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र सरकारकडून आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या व्हायरल व्हिडिओशी संबंधित खरी माहिती शेअर केली गेली आहे. चला तर मग त्याविषयी जाणून घेऊयात …

The embarrassment that is PIB Fact Check: Who fact-checks this 'fact checker'?

- Advertisement -

‘या’ व्हायरल मेसेजमध्ये म्हटले कि…

केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजनेंतर्गत प्रत्येक मुलीला 1,50,000 रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचा दावा एका YouTube व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. PIB factCheck

ही बातमी बनावट असल्याचे PIB factCheck ने सांगितले

सरकारची अधिकृत वृत्तसंस्था असलेल्या PIB factCheck ने ट्विट करून या बातमीमागील सत्यतेची माहिती दिली आहे. पीआयबीने ट्विटरवरून याबाबत इशारा देताना सांगितले की सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नाही आणि हा मेसेज पूर्णपणे बनावट आहे.

Fake News की फैक्ट चेक करने वाली सरकारी एजेंसी PIB को भी नहीं छोड़ा! किसने बना दी 'फर्जी' वेबसाइट? | TV9 Bharatvarsh

अशा प्रकारे तपासा बातमीची सत्यता

सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक चुकीच्या बातम्या व्हायरल होतात. जर आपल्यालाही व्हॉट्सऍप किंवा सोशल मीडिया अकाऊंटवरील एखाद्या बातमीबाबत संशय असेल तर PIB factCheck द्वारे त्याची सत्यता तपासता येईल. यासाठी https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, 8799711259 हा WhatsApp नंबर किंवा pibfactcheck@gmail.com या ईमेलवर देखील माहिती पाठवू शकाल.

हे पण वाचा :
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी FD वर देते आहे 7.50% पेक्षा जास्त व्याज
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्तहिकरीत्या वाढ, गेले आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ते जाणून घ्या
सणासुदीच्या काळात ‘या’ बँकांकडून मिळेल कमी व्याजदरात Home Loan !!!
Indian Overseas Bank ने FD वरील व्याजदरात केला बदल, नवीन व्याज दर पहा