PIB FactCheck : PAN अपडेट केले नाही तर SBI खाते बंद होणार, ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB FactCheck : SBI खातेदारांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. सध्या सोशल मीडियावर SBI च्या खात्याबाबत एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोआहे. ज्यामध्ये असे म्हटले गेले आहे की, जर ग्राहकाने आपला पॅन नंबर अपडेट केला नाही तर SBI खाते बंद केले जाईल. मात्र सरकारकडून आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या मेसेजशी संबंधित तथ्य शेअर केकरण्यात आले आहे. PIB FactCheck

State Bank of India (SBI) - State Bank of India raises $300 million from Formosa bonds - Telegraph India

व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटले गेले आहे

या व्हायरल मेसेजमध्ये असे म्हटले गेले आहे कि, ”जर SBI ग्राहकाने आपले पॅन कार्ड अपडेट केले नाही तर त्याचे SBI YONO Account आजच बंद केले जाईल.” PIB FactCheck

PIB ने मेसेज बनावट असल्याचे सांगितले

भारत सरकारची प्रेस एजन्सी असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या व्हायरल मेसेजमागची सत्यता सांगितली आहे. PIB FactCheck कडून करण्यात आलेल्या तथ्य तपासणीत हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. आपल्या फॅक्ट चेक अकाउंटवरून PIB ने ट्विट करत म्हटले की, “स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने पाठवलेला हा मेसेज पूर्णपणे बनावट आहे. SBI कडून कोणालाही मेसेजद्वारे आपली वैयक्तिक माहिती अपडेट करण्यास सांगितले जात नाही. जर आपल्यालाही असा एखादा मेसेज आला असेल तर [email protected] या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवता येईल. याशिवाय 1930 या क्रमांकावर कॉल करूनही तक्रार नोंदवता येईल.

The embarrassment that is PIB Fact Check: Who fact-checks this 'fact checker'?

सरकारशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या बातम्यांबाबत अशा प्रकारे करा तक्रार

सरकारशी संबंधित कोणतीही दिशाभूल करणारी बातमी जाणून घेण्यासाठी PIB Fact Check ची मदत घेता येईल. PIB FactCheck च्या 918799711259 या व्हॉट्सऍप नंबरवर किंवा [email protected] वर मेल करून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा URL पाठवता येईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pib.gov.in/factcheck.aspx

हे पण वाचा :

Bank Loan : SBI खातेदारांना FD वर घेता येऊ शकेल कर्ज, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

Bajaj Finance च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा

HSBC Bank कडून FD वरील व्याजदरात बदल, नवीन दर तपासा

Stock Market : Sensex मधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!

सध्याच्या काळात Bank FD मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल का??? तज्ञ काय सांगतेय ते पहा