PIB FactCheck : SBI कडून महिलांना कोणत्याही गॅरेंटीशिवाय मिळेल ₹ 25 लाखांचे कर्ज, ‘या’ मेसेज मागील सत्यता तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB FactCheck : सध्याच्या काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. सोशल मीडियाचे जितके फायदे तितके तोटे देखील आहेत. याद्वारे अनेक चांगल्या गोष्टींना हातभार लागतो. मात्र याद्वारे अनेकदा चुकीच्या बातम्या देखील पसरविल्या जातात. याद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. नुकतेच यूट्यूब चॅनेलवर सरकारच्या अनेक योजनांबाबत दिशाभूल करणारे किंवा खोटे दावे करणारे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. मात्र सरकारकडून आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून असे व्हायरल मेसेजेस किंवा व्हिडिओंशी संबंधित सत्य समोर आणले आहे.

SBI to cut base rate by 5 bps to 7.45% from Sept 15

‘या’ व्हायरल मेसेजमध्ये काय सांगण्यात आले…

या व्हायरल मेसेजमध्ये असे सांगण्यात आले आहे कि, सरकारच्या ‘नारी शक्ती योजने’ अंतर्गत SBI कडून 25 लाख रुपयांचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय आणि व्याजाशिवाय दिले जात आहे. त्याचवेळी, आणखी एका व्हायरल व्हिडिओमध्ये, केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री कन्या सन्मान योजने’ अंतर्गत मुलींना दर महिन्याला 2500 रुपये दिले जात आहेत. तसेच हे पैसे थेट मुलीच्या बँक खात्यात पोहोचत आहेत असे म्हंटले गेले आहे. PIB FactCheck

याशिवाय ‘महिला स्वरोजगार योजने’अंतर्गत सरकार 10 लाख रुपयांची रक्कम ट्रान्सफर करत असल्याचा दावाही अनेक यूट्यूब चॅनलद्वारे केला जात आहे.

PIB ने मेसेज बनावट असल्याचे सांगितले

भारत सरकारची प्रेस एजन्सी असलेल्या PIB ने या व्हायरल मेसेजच्या खरेपणाबाबत सांगितले आहे. PIB ने आपल्या फॅक्ट चेक अकाउंटवरून ट्विट करत सांगितले की, काही यूट्यूब चॅनेलवर विविध सरकारी योजनांशी संबंधित माहिती दिली जात आहे, जी प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. काही फसवणूक करणाऱ्यांनी चुकीच्या भावनेने तयार केलेल्या अशा योजनेला बळी पडू नका. या व्हिडिओंमध्ये दिलेल्या वेबसाइटवर आपली वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नका, असे PIB ने म्हटले आहे. सायबर गुन्हेगारांकडून आपल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. PIB FactCheck

The embarrassment that is PIB Fact Check: Who fact-checks this 'fact checker'?

सरकारशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या बातम्यांबाबत अशा प्रकारे करा तक्रार

सरकारशी संबंधित कोणतीही दिशाभूल करणारी बातमी जाणून घेण्यासाठी आपल्याला PIB FactCheckची मदत देखील घेता येऊ शकेल. कोट्याही व्यक्तीला PIB FactCheck च्या 918799711259 या WhatsApp क्रमांकावर किंवा [email protected] वर मेल करून दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा URL पाठवता येईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pib.gov.in/factcheck.aspx

हे पण वाचा :

RBI कडून ‘या’ बँकेचे लायसन्स रद्द, आता खातेदारांच्या पैशांचे काय होणार ???

Indian Bank ने सुरु केली स्पेशल FD योजना, नवीन व्याज दर पहा !!!

Multibagger Stock : पतंजली फूड्सच्या शेअर्सने गेल्या 3 वर्षात दिला 39,000% रिटर्न !!!

Indian Overseas Bank च्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा

Stock Market मधील ‘या’ सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली 1.33 लाख कोटी रुपयांची वाढ