तुम्हीही लोणचं जास्त प्रमाणात खाता का? मग आधी हे वाचाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीयांचे जेवण म्हणजे एकदम चटपटीत, चटकदार असते. त्यातल्या त्यात जर जेवणाला चविची मज्जा येण्यासाठी अनेकजण लोणच्याचा वापर करतात. लोणचं म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. मात्र तुम्हाला या चटपटीत, चटकदार लोणच्याचे अधिक सेवन केल्यास होणारे परिणाम माहित आहेत का? नसेल माहिती तर चला जाणून घेऊयात.

लोणच्यामुळे वाढतो रक्तदाब

जेवणाला चव येण्यासाठी लोणच्याचा अनेकजण जास्तीचा वापर करतात. जेवढे लोणचे खाणे चांगले आहे. तेवढेच त्याचे दुष्परिणामही आहेत. लोणच्यामध्ये अधिक प्रमाणात सोडीयम असते. त्यामुळे तुम्ही जर त्याचे अधिक सेवन केले तर त्याचा वाईट परिणाम हा तुमच्या शरीरावर होऊ शकतो. लोणच्यातील अतिरिक्त सोडीयममुळे रक्तदाब वाढतो. ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि इतर आजार होऊ शकतात.

कोलेस्टरॉलचे प्रमाण वाढते

लोणचं हे चवीला चांगले लागावे तसेच ते अधिक काळ टीकावे यासाठी त्यामध्ये विविध घटकांचा समावेश करण्यात येतो. त्यामध्ये तेलाचे प्रमाण हे सर्वाधिक असते. त्यामुळे तुम्ही जर जास्त प्रमाणात लोणचं खात असाल तर तुमच्याशी शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. तसेच त्यामुळे हृदयाला धिकाही निर्माण होऊ शकतो. तज्ञ सांगतात की, कोलेस्ट्रॉल गे केवळ हृदयालाच नाही तर यकृतालाही हानी पोहोचवते. एवढेच नाही तर लोणच्यामध्ये जे तेल वापरले जाते त्या तेलात ट्रान्स फॅट असते, जे एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करते. त्यामुळे तुमच्याशी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आजच आहारातील लोणच्याचे प्रमाण कमी करा.

मूत्रपिंड होते खराब

लोणच्याचे अनेक प्रकार पडतात. त्यामध्ये लिंबू, आंबा, हळद, मिरची, आवळा यासारख्या पासून लोणचं तयार केल जात. लोणच्याच्या अधिक सेवनामुळे मूत्रपिंड खराब होऊ शकते. तसेच हाडे कमकुवत होणे यासारख्या तक्रारीही सूरु होतात. साधारनपणे आंब्याच्या लोणच्यामध्ये 569 मिलीग्राम सोडियम असते. आपल्या शरीराला दररोज 2,300 मिलीग्राम सोडीयमची आवश्यकता असते.  परंतु लोणच्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या शरीरातही त्याचे प्रमाण वाढले जाते. हे प्रमाण वाढले की, शरीरातील पाणी टिकून राहणे, पोटात सूज येणे, उच्च रक्तदाब आणि किडनीवर परिणाम दिसून येतो. आणि परिणामी मूत्रपिंडावर त्याचा परिणाम होते.